Home » राज्य » प्रशासकीय » यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी ऑफ बी फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी ऑफ बी फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी ऑफ बी फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या फॅकल्टी ऑफ बी फार्मसी विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. नुकतेच बी फार्मसी च्या तिसऱ्या,पाचव्या आणि सातव्या सेमिस्टर चे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होण्याची किमया साकारली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बी फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या,पाचव्या आणि सातव्या सेमिस्टरच्या परीक्षांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. तिसऱ्या सेमिस्टर मधून कु सिद्धी जाधव (एस जी पी ए ८.६७ हिने प्रथम क्रमांक पटकावला. पाचव्या सेमिस्टर मधून कु सोनाली कोळेकर (एस जी पी ए ८.४६) हिने प्रथम क्रमांक पटकावला. सातव्या सेमिस्टर मधून कु संजना पवार (एस जी पी ए ९) हिने प्रथम क्रमांक पटकावला. 

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अत्याधुनिक लॅबोरेटोरीस,अनुभवी शिक्षक स्टाफ प्रशस्त आणि सुसज्ज ग्रंथालय,संगणक विभाग याना दिले. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्व विकासाला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले जाते.

विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल संस्थापक अध्यक्ष प्रा दशरथ सगरे ,उपाध्यक्ष प्रा अजिंक्य सगरे,प्राचार्य डॉ व्ही के रेदासानी,विभाग प्रमुख डॉ ए एम भागवत व सर्व शिक्षक स्टाफ आदींनी त्यांचे अभिनंदन केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ

Post Views: 35 सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ सोलापूर – राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा

Live Cricket