यशोदा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात चिमुकल्या वैष्णवांचा मेळा, विठ्ठल नामाचा अखंड गजर
रिमझिमणाऱ्या पावसात आषाढी वारीचा उत्साह शिगेला, उपस्थितांची मने प्रफुल्लित
महाराष्ट्राला वारकऱ्यांचा आणि त्यांच्या भक्तीचा सांप्रदायिक वारसा लावला आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन चाललेल्या प्रत्येक वारकऱ्याचा हा थक्क करणारा प्रवास यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज अनुभवला. यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे आणि इतर मान्यवरांनी वारीचे दर्शन घेतले आणि पूजनही केले.
माऊली… माऊली चा गजर करत शेकडो चिमुकल्यांनी जणू विठ्ठल माऊलीला भेटण्याची आपली प्रचंड इच्छाशक्ती प्रदर्शित केल्याचे यशोदा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आढळून आले. चिमुकल्या वारकऱ्यांचा हा मेळा जनु आज विठ्ठलाचे दर्शन घेऊनच माघारी फिरे ल अशा भक्तिमय वातावरणात बघणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित करण्याचे काम आषाढी वारी मध्ये सहभागी झालेल्या लहानग्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या लहान वयामध्ये त्यांच्या मनावरती सांस्कृतिक संस्कार होणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. जाती-जातीमध्ये वाढणारा भेदभाव हा समाजाची दिशा बिघडवताना दिसत आहे. सामाजिक समतोल साधण्यासाठी सर्वधर्मसमभावाची शिकवण देण्यासाठी अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थितांचे एकच लक्ष वेधले होते. यशोदा टेक्निकल कॅम्पसचा अवघा परिसर विठ्ठलमय झाल्याचे आणि या लहानग्या वारकऱ्यांना भेटून आत्मिक मनाचे समाधान झाल्याचे प्रा. दशरथ सगरे यांनी यावेळी सांगितले.