यशोदा मध्ये प्रवेशासह आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी
NATA 2025 साठी नोंदणीची अंतिम तारीख ५ ऑगस्ट
सातारा -आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एकदा प्रवेश परीक्षेची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आर्किटेक्चर उपयुक्तता चाचणी (NATA) 2025 साठी नोंदणीची अंतिम तारीख सोमवार, ५ ऑगस्ट २०२५ आहे. ही परीक्षा भारतातील सर्व मान्यताप्राप्त आर्किटेक्चर कॉलेजांमध्ये पाच वर्षांच्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी आवश्यक आहे. NATA ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असून, विद्यार्थ्याच्या आर्किटेक्चरल अभ्यासासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा आढावा घेते. यामध्ये रेखाचित्र क्षमतेबरोबरच दृश्य समज, सौंदर्यदृष्टी, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि सर्जनशील विचार यांचे मूल्यमापन केले जाते.
ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने घेतली जाते आणि यात वस्तुनिष्ठ तसेच सर्जनशील प्रश्नांचा समावेश असतो. NATA परीक्षा एका वर्षात एकापेक्षा अधिक वेळा देता येते आणि विद्यार्थ्याच्या सर्वोत्तम गुणांचा विचार करून प्रवेश दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक गुणवत्तेनुसार प्रवेशाची संधी अधिक मिळते. NATA साठी पात्रता ही १२ वी गणित विषयासह उत्तीर्ण असणे किंवा गणित विषयासह १०+३ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी www.nata.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणी प्रक्रियेत अडचण येत असल्यास किंवा अभ्यासक्रम, पात्रता व प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती हवी असल्यास, यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर , सातारा येथे संपर्क साधावा. यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरहे सातारा जिल्ह्यातील एक मान्यताप्राप्त व मार्गदर्शक संस्था असून आर्किटेक्चर क्षेत्रातील करिअरसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ही संधी न गमावता वेळेत नोंदणी करून आपल्या आर्किटेक्चर करिअरची दिशा ठरवावी असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
