Home » राज्य » शेत शिवार » यंदा मोसमी पावसाची आनंद वार्ता ; सरासरीपेक्षा जास्त, पाऊस पडण्याचा अंदाज

यंदा मोसमी पावसाची आनंद वार्ता ; सरासरीपेक्षा जास्त, पाऊस पडण्याचा अंदाज

यंदा मोसमी पावसाची आनंद वार्ता ; सरासरीपेक्षा जास्त, पाऊस पडण्याचा अंदाज

मुंबई : संपूर्ण देशाचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मोसमी पावसाची आनंद वार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 

संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रीय होण्याची स्थिती नाही. हिंदी महासागरीय द्विध्रुविताही तटस्थ आहे. डिसेंबर – मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रशांत महासागरात ला निना अथवा एल निनो, अशी कोणतीही स्थिती सक्रीय नाही. ला निना नंतरची निष्क्रीय स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर, या चार महिन्यांत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी महासागरीय द्विध्रुविता ( आयओडी) स्थितीही निष्क्रीय आहे. पावसाळ्यात ती सक्रीय होण्याची स्थिती नाही. तसेच युरोप आणि आशियातील बर्फाच्छादित प्रदेश सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. बर्फाच्छादित प्रदेश कमी राहिला तर मोसमी पावसाला पोषक स्थिती असते. त्यामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे.

देशात १९७१ ते २०२० च्या तुलनेत सरासरी ८७ सेमी पाऊस पडतो. त्यात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सन्मानाने जगण्याचा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-प्रा विक्रम कदम

Post Views: 83 सन्मानाने जगण्याचा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-प्रा विक्रम कदम तांबवे –“प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत मेहनतीने व चिकाटीने शिक्षण

Live Cricket