Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई तालुक्यातील तीन गावांनी घेतला आ.मकरंद पाटील यांना मतदान न करण्याचा निर्णय?

वाई तालुक्यातील तीन गावांनी घेतला आ.मकरंद पाटील यांना मतदान न करण्याचा निर्णय?

वाई : वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी असणाऱ्या स्टोन क्रशरला देण्यात आलेल्या परवानगीमुळे कुसगाव, व्याहळी व एकसर या तीन गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेले असून आ. मकरंद पाटील यांनी याप्रकरणी मौन धारण असून ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.यापुढे मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. स्थानिक आ.मकरंद पाटील, वाईचे प्रांत व तहसीलदार यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

 या खाणपट्टा स्टोन क्रशरसाठी बेकायदेशीर परवानगी देऊन यासाठी चुकीची कागदपत्रे पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या क्रशरबाबत कोणत्याही ग्रामसभेत ठराव मंजूर झालेला नसून ज्या क्षेत्रात ही खाण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचाही यासाठी विरोध आहे. या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नैसर्गिक पाण्याचे झरे मुजले आहेत, अशा अनेक त्रुटी ठेवून हे क्रशर चालवले जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 76 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket