Home » Uncategorized » क्राईम डायरी » वाई तालुक्यातील खानापुर येथे चोरट्यांनी घर व दुकान फोडुन एका दुचाकीसह पाच लाखांचा मुद्देमाल केला लंपास

वाई तालुक्यातील खानापुर येथे चोरट्यांनी घर व दुकान फोडुन एका दुचाकीसह पाच लाखांचा मुद्देमाल केला लंपास

वाई तालुक्यातील खानापुर येथे चोरट्यांनी घर व दुकान फोडुन एका दुचाकीसह पाच लाखांचा मुद्देमाल केला लंपास

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई तालुक्यातील खानापुर गावात मध्यरात्री अज्ञात ३ चोरट्यांनी हातात कोयते घेऊन प्रवेश करुन ऐक दुकान आणी एक घर फोडुन सहा तोळे  सोन्याचे दागिने ४० हजार रुपयांची रोख रक्कमेसह एक दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .या घटनेने खानापुर गावा‌सह परिसरात खळबळ उडाली आहे . या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे . 

घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की अंदाज खानापुर ता .वाई येथील रहिवासी असलेले भगवान विष्णू जाधव हे पत्नीसह मध्यरात्री झोपेत असताना त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा अज्ञात ३ चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने तोडुन घरात प्रवेश करुन कपाटात ठेवले‌ले सहा तोळे असणारे सोन्याचे दागिने आणी पाच हजार रुपयांची रोख रक्कम व संजय हणमंत जाधव यांच्या मालकीचे असणारे  संजय किराणा स्टोअर्स याचेही कटावणीच्या साह्याने दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन दुकानात ठेवलेले ४० हजार रुपयांची रोख रक्कम मध्य रात्रीच्या दरम्यान लंपास केली आहे .तर येथीलच रहिवासी असलेले सचिन महादेव चव्हाण यांनी घरा समोर पार्क केलेली  ७० हजार रुपये किंमतीची ड्रिम युगा हि दुचाकीही चोरट्यांनी ढकलत नेहुन ति लंपास केली आहे .असा एकुण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेहुन पोबारा केला आहे .

या गंभीर घटनेची माहिती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाई पोलिस ठाण्यात  ड्युटीवर असलेले ए .बी . पाटणकर यांना समजताच ते तातडीने घटनास्थळावर दाखल झाले आणी घडल्या प्रकाराची माहिती संकलित करून ति पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना कळविली.

मिळालेली माहिती गंभीर असल्याने त्यांनी आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण पि.एस. आय सुर्वे यांच्यासह डिबीची संपूर्ण टिम सोबत घेऊन खानापुर गावात दाखल झाले.या सर्व पोलिस अधिकाऱ्यानी घरफोडी झालेल्या घरांना भेटी देऊन आवश्यक माहिती गोळा करून व घटनेचे गांभीर्य ओळखून हि माहिती जिल्हा पोलिस प्रमुख आणी वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचिम यांना तातडीने कळविण्यात आली .हि माहिती मिळताच बाळासाहेब भालचिम  यांनी देखील घटना स्थळांना भेटी देऊन विशेष मार्गदर्शन करून आरोपी पकडण्या साठी पोलिस पथके पाठवण्याच्या सुचना दिल्या आहेत तर डिबी पथकाला गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची   तपासणी करून आरोपी निष्पन्न करून त्यांना गजाआड करावे अशा सुचना दिल्या आहेत.

पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी झालेल्या चोरींचा जलदगतीने उलगडा व्हायला हवा या साठी सातारा येथुन डॉगस्काॅड आणी ठसे तज्ञांना पाचारण केले होते . सर्व पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचाऱ्याना आवश्यक माहिती पुरविण्या साठी खानापुर गावचे पोलिस पाटील वैभव सुर्यवंशी हे सकाळ पासुन दिवसभर सोबत दिसत होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 146 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket