“वाई तालुक्यात भगव्या लाटेची तयारी – विकास आण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दमदार विस्तार”-रविंद्र भिलारे
“खोटी बातमी फेटाळली – शिवसेना पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका
“शिवसेनेचे ८०% समाजकारण, २०% राजकारण – वाई तालुक्यात भगवा फडकवण्याचा निर्धार”
वाई प्रतिनिधी -शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना भरघोस विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपर्कप्रमुख श्री. शरदजी कणसे, सहसंपर्कप्रमुख श्री. एकनाथ ओंबळे, जिल्हा प्रमुख रणजितदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी गैरसमजातून नाराजी व्यक्त केली असली तरी ती दूर करण्यात येईल. विधानसभा प्रमुख श्री.विकासआण्णा शिंदे यांच्यावर काही ठिकाणी राजकीय बेरीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ गैरसमज निर्माण झाले असले तरी त्यांच्या भूमिकेबाबत कुठलीही शंका नाही. विकासआण्णा शिंदे यांनी वाई तालुक्यात शिवसेना महिला आघाडी व युवासेना यांच्या १०५ शाखा सुरू करून विक्रमी १० हजारांपेक्षा अधिक सभासद नोंदणी केली आहे.
शिवसेना पक्षाचे धोरण स्पष्ट आहे – ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. या धोरणानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजूट व संयम राखून कार्य करणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाई तालुक्यात भगवा फडकवण्या साठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन शिवसेना वाई तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे यांनी केली आहे.
या निवेदनात सोपान चिकणे,नितीन चोरट, दत्तात्रय पोळ यांच्या सह्या आहेत. दिलीप पवार, युवराज कोंढाळकर यांनी खोट्या बातमीचे खंडन केले असून विकास अण्णा शिंदे यांच्या बद्दल कोणतेही तक्रार नसल्याचे सांगत त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
