Home » देश » वाई नगरपालिका निवडणूक 2025 —शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) दमदार बिगुल!अध्यक्षपदासाठी प्रवीण (बापूसो) शिंदे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

वाई नगरपालिका निवडणूक 2025 —शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) दमदार बिगुल!अध्यक्षपदासाठी प्रवीण (बापूसो) शिंदे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

वाई नगरपालिका निवडणूक 2025 —शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) दमदार बिगुल!अध्यक्षपदासाठी प्रवीण (बापूसो) शिंदे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

वाई – वाई नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. शिवसेना (श्री.एकनाथ शिंदे साहेब) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी श्री. प्रवीण दिनकर (बापूसो) शिंदे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज विधीपूर्वक दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

अर्ज दाखल करताना युवा नेते विकास शिंदे, विराज शिंदे,पक्षाचे नेते, वाई तालुक्यातील शिवसैनिक, युवा बळ आणि माता-भगिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, पर्यटनवाढ आणि आधुनिक सुविधा याबाबत प्रवीण (बापूसो) शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आगामी काळात वाईचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना (शिंदे गट) वाईमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज असून, नागरिकांशी सातत्याने संपर्क, विकासकामांची पायाभरणी आणि संघटनशक्ती यांचा भरोसा यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे बळ ठरणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्ज दाखल होताच परिसरात “जय महाराष्ट्र!”, “शिवसेना जिंदाबाद!” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

वाई शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या या निवडणुकीत प्रवीण (बापूसो) शिंदे यांची उमेदवारी शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket