वाईच्या राजकारणात तरुणाईचा नवा चेहरा –अमर कोल्हापुरेंच्या उमेदवारीभोवती उत्सुकता
अमर कोल्हापुरेंना निवडणुकीत उतरवण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
वाई – आगामी नगरपालिका निवडणुकीला रंग चढत असताना वाई शहरात तरुणाईचा आश्वासक चेहरा म्हणून अमर कोल्हापुरे यांचे नाव मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करत उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छ प्रतिमेमुळे शहराच्या राजकारणात ते नवा पर्याय ठरू शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
वारशातून तयार झालेला नेतृत्वाचा पाया
अमर कोल्हापुरे यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व.आनंद कोल्हापुरे. समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, प्रामाणिकपणा आणि कष्टांची परंपरा — हा वारसा अमर कोल्हापुरे यांनी सक्षमपणे पुढे नेल्याचे कार्यकर्ते विशेषत्वाने सांगतात.
अमर कोल्हापुरे स्वतः म्हणतात,“स्व. आनंद कोल्हापुरे यांची समाजसेवेची परंपरा हीच माझी प्रेरणा आहे.”
तरुण उद्योजकतेचा आदर्श
शिक्षण घेत असतानाच नोकरीपेक्षा रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शहरात पारदर्शक, प्रामाणिक आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवस्थेचे मॉडेल उभे करून त्यांनी व्यवसायात वेगळी ओळख निर्माण केली.
अनेक तरुणांनी त्यांच्या मार्गदर्शनातून व्यवसाय सुरू केला असून ते तरुणाईसाठी खरे प्रेरणास्थान मानले जातात.सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास शिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अमर कोल्हापुरे यांचा सातत्यपूर्ण सहभाग आहे. गरजूंना मदत आणि समाजकार्याची त्यांची भूमिका शहरात विशेष चर्चेत असते.याच कार्यपद्धतीमुळे निवडणूक रिंगणात त्यांनी उभे राहावे, अशी मागणी शहरातील तरुण, विविध संस्थांचे कार्यकर्ते तसेच व्यवसायिक वर्तुळातून होताना दिसत आहे.
नगरपालिका निवडणुकीत समीकरणे बदलतील?
अमर कोल्हापुरे रिंगणात उतरल्यास वाई नगरपालिकेच्या ढवळाढवळलेल्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.तरुणाई, उद्योजक व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे मानले जात आहे.




