वाई मांढरदेवी रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा
मांढरदेव प्रतिनिधी -वाई मांढरदेव रस्त्याचे काम चालू असल्यामुळे ठेकेदाराकडून योग्य नियोजन न केल्याने आज काळुबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना घाटात वाहतूक कोंडीचा फटका बसला भाविक घाटामध्ये दोन ते तीन तास ताटकळत बसावे लागले त्यामुळे भाविकांमधून तीव्र नाजाजीचा सूर उमटला आहे. कापूरहोळ-भोर-मांढरदेव-वाई अशा मार्गाचे काम दोन वर्षापासून चालू आहे या कामासाठी मांढरदेवी-भोर घाट काही महिने बंद ठेवण्यात आला होता या घाटाचे काम चालू असतानाच वाई मांढरदेवी घाटाच्या कामाला ठेकेदाराने प्रारंभ केला आहे.
काम चालू असताना रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे मात्र पर्यायी मार्गाची व्यवस्था नीट न केल्याने श्री काळुबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना घाटात आज दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागले घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने भाविक ताटकळत राहिले यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. घाटात झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाविकच प्रयत्नशील होते प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
आज रविवार सुट्टीचा वार असल्याने मांढरदेव मध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती भाविक दुचाकी, रिक्षा, कार,बस या साधनांनी मांढरदेवला येत होते मात्र वाईहून आल्यावर तीन तास घाटात अडकून पडल्याने मांढरदेव येथे तीन तास उशिरा पोहोचत होते वास्तविक एकेरी वाहतूक चालू असताना ठेकेदारांनी काही लोक नेमून वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्याने पुणे,मुंबई,नाशिक,कोल्हापूर,सातारा, वाई या ठिकाणाहून आलेले भाविक घाटातच अडकून पडले त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सोसावा लागला. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन योग्य नियोजन करावे अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
