वाई-खंडाळा-विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवणारच तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा निर्धार अनिल जगताप
सातारा (अली मुजावर)- विधानसभा निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची दाट शक्यता गृहीत धरुन राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील हालचालीही वाढल्या आहेत.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्याचा निर्धार अनिल जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आलेले औद्योगिक क्षेत्र विद्यमान आमदारांच्या अकार्यक्षमतेमुळे परत गेले. आपल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये औद्योगिक क्षेत्र वाढवण्याबरोबरच पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे अनिल जगताप म्हणाले.
मी सर्वसामान्य घरातला असल्याने सर्वसामान्यांच्या व्यथा जाणू शकतो. माझी उमेदवारी ही सर्वसामान्य साठीच असल्याने वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघांमध्ये परिवर्तन हे निश्चित आहे. आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात संधी मिळाल्यास आपल्या मतदारसंघाचा निश्चितच कायापालट करून आपली उमेदवारी सिद्ध करणार असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.अनिल जगताप यांनी गावोगावी जावून संपर्क अभियान चालू केले असून सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्या या अभियानास प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
मतदार संघाचे सर्व प्रश्न व समस्या मला पूर्णत: ज्ञात आहेत. त्या समस्या मार्गी लावून मतदार संघाची विकासात्मक वेगळी ओळख आपण निर्माण करणार आहोत,वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघास विकासाचे रोल मॉडेल करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.जनतेच्या पाठबळावर खंबीर उभे राहून लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात मी कार्यरत आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार साहेबांना मानणारा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा गट या ठिकाणी आहे. या पार्श्वभूमीवर अनिल जगताप यांची भूमिका वाई विधानसभा मतदारसंघासाठी महत्वाची ठरणार आहे.