Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » वाई फेस्टिवल २०२५ : कला, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा मेळावा

वाई फेस्टिवल २०२५ : कला, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा मेळावा

वाई फेस्टिवल २०२५ : कला, क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा मेळावा

वाई – स्व.आनंद अण्णा कोल्हापुरे यांचे कल्पनेतून कला, क्रीडा, आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सुरू झालेला वाई फेस्टिवल हे वाईकरांचे आणि कलाप्रेमींचे विशेष आकर्षण ठरले आहे. यंदा वाई फेस्टिवल २०२५ चे १८ वे वर्ष असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. कल्पकतेला वाव देणारी व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खुली असणारी भव्य चित्रकला स्पर्धा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ७.३० वा स्थळ – महागणपती घाट वाई येथे आयोजित केली आहे. ही स्पर्धा ७ गटात आयोजित केली असून गट क्र.१ इयत्ता १ ली ते २ री – विषय आइस क्रीम कांडी, मोठे फूल (आवडते), गट क्र.२ – इयत्ता ३ री ते ४ थी – विषय – रंगीत फुलपाखरू, टेडि बेअर (बाहुली), भारताचा झेंडा, गट क्र.३ इयत्ता ५ वी ते ६ वी – विषय – घरच्या टेरेस वर आम्ही पतंग उडवतो (किमान २ व्यक्ति आवश्यक ), झेंडा वंदन (शालेय किंवा इतर), गट क्र.४ इयत्ता ७ वी ते ८ वी – विषय -फळ विक्रेता व गिर्हाइक, मी व माझी बहीण आईला घरकामात मदत करतो, आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी, गट क्र.५ इयत्ता ९ वी ते १० वी – विषय निवडणूक प्रचार व सभा, सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्या स्त्रिया, लढावू विमान, गट क्र.६ – खुला गट – विषय – कॉम्प्युटर वर अभ्यास करणारे विद्यार्थी, निसर्ग रम्य ठिकाण (निसर्ग चित्र), कचरा गाडीत कचरा टाकणारे नागरिक (किमान २ ते ३ व्यक्ति), ऑपरेशन सिंदूर (युद्ध जन्य स्थिति), गट क्र.७ – विशेष गट – विषय – आवडते फळ, मी चित्र काढतो, असे चित्रकला स्पर्धेचे गत निहाय विषय आहेत. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे रक्तदान शिबीर रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वा. स्थळ – काशिविश्वेशर मंदिर महागणपती घाट वाई, तसेच उत्कर्ष पतसंस्थेच्या सर्व शाखांचे ठिकाणी आयोजित करणेत आली आहे. वाईतील विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी TALENT स्पर्धा शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वा. कै. सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा वाई, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारी सायकल रॅली रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वा. स्थळ – महागणपती घाट येथून सुरवात करून संपूर्ण वाई शहरात, शरीराची श्रीमंती दाखवणारा जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार दि १९ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६:०० वा महागणपती घाट वाई, नृत्यातील वैविध्यपूर्ण शैली दाखवणारी राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा शनिवार दि २० डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६:०० वा महागणपती घाट वाई, तसेच वाईकरांचे मनोरंजन करणारा झी मराठी वाहिनीचा “उत्सव नात्यांचा” या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि २१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६:०० वा महागणपती घाट वाई येथे फेस्टिवल च्या अंतर्गत करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांना वाईकरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेचे निमंत्रक श्री अमर आनंद कोल्हापुरे यांनी पत्रकार परिषदेत केले. वाई फेस्टिवलचा मुख्य हेतू म्हणजे वाईमधील विविध कलाकारांना , त्यांच्या कलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे, तरुण पिढीला प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलता वाढवणे हा असून वाई फेस्टिवल हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नाही तर विविध कला, कलाकार, आणि संस्कृती यांना एकत्र आणणारा एक सेतू आहे.

आपल्या वाईच्या मातीशी, परंपरांशी, आणि संस्कृतीशी जोडलेल्या या उत्सवामध्ये नवे विचार, नवे प्रयोग, आणि नव्या पिढीच्या कल्पकतेला चालना मिळते. हा उत्सव वाईच्या कलाप्रेमींनी निर्माण केलेल्या प्रोत्साहनाचा परिणाम असून वाईकरांच्या योगदानामुळे आणि सहभागामुळे वाई फेस्टिवल एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. या सोहळ्याचे हे १८ वे वर्ष असून हा सोहळा अविरत सुरु राहण्यापाठीमागे आयोजक म्हणून उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना वाई , तसेच अनेक दानशूर प्रायोजक व मार्गदर्शक, सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. यंदाचा देखील वाई फेस्टिवल हा अधिक रंगतदार, भव्य आणि प्रेरणादायी होण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, स्पर्धक प्रेक्षक व प्रायोजक म्हणून सहभागी व्हावे आणि हा सोहळा संस्मरणीय बनवावा असे आवाहन फेस्टिवल चे अध्यक्ष श्री संजय वाईकर यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव केवळ वाईपुरता सिमित राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक ठळक ठसा उमटवेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाई फेस्टिवल मध्य सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई अथवा ८६८७१००१०० यावर संपर्क करावा असे फेस्टिवलचे कोषाध्यक्ष adv.रमेश यादव व सचिव श्री सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी फेस्टिवल चे समिती सदस्य श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे , श्री सलीमभाई बागवान , श्री शरद चव्हाण , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्री शैलेंद्र गोखले , श्री अमीर बागुल , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री नितीन वाघचौडे , श्री तुकाराम जेधे , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे, श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर , श्री निखिल चव्हाण , श्री नितीन शिंदे , श्री ओंकार सपकाळ हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 31 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket