जागतिक हिवताप दिन वाई तालुक्यात साजरा
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)जागतिक हिवताप दिन वाई तालुक्यात साजरा दिनांक 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वाई तालुक्यातील कवठे, बावधन,भुईंज, मालतपूर या प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय वाई यांचे मार्फत विविध उपक्रमाद्वारे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. मा. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वाळुजकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा यांनी प्रभात फेरी, ग्रामसभा तरुण व महिलांच्या गटसभा घेऊन कीटकजन्य आजार यामध्ये प्रामुख्याने डासांपासून होणारे आजार त्याची लक्षणे व उपचार याबाबत माहिती दिली. तसेच या आजारापासून नागरिकांचा बचाव करणे करिता करावयाच्या उपाययोजना यामध्ये आठवड्यातून एकदा सर्व पाणीसाठे घासून पुसून स्वच्छ करणे,कोरडा दिवस पाळणे, व्हेंट पाईपला जाळी बसविणे, भंगार सामानाची विल्हेवाट लावणे, गटारे व पाण्याची डबकी वहाती करणे करणे व मच्छरदाणीचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले.