Home » ठळक बातम्या » प्राथमिक शिक्षक बँक शाखा महाबळेश्वरच्या वतीने महिला मेळावा संपन्न

प्राथमिक शिक्षक बँक शाखा महाबळेश्वरच्या वतीने महिला मेळावा संपन्न

  • प्राथमिक शिक्षक बँक शाखा महाबळेश्वरच्या वतीने महिला मेळावा संपन्न

सातारा: प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सातारा ही महाराष्ट्र राज्यातील पगारदार नोकरांची अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. २०२४-२५ हे वर्ष बँकेचे शताब्दी महोत्सव वर्ष आहे. या शताब्दी महोत्सव निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सभासद, यांच्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल ८३ महिला शिक्षिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. सौ. रेणुका ओंबळे कायदेतज्ञ अध्यक्ष म्हणून तर सौ स्वाती भांगडीया रोटरी क्लब प्रमुख पाहुण्या व महाबळेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे उपस्थित होते.

शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, संचालक विजय ढमाळ, नितिन फरांदे संजय संकपाळ, व शाखाधिकारी विलास वाडकर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान विजय ढमाळ यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. चेअरमन किरण यादव यांनी बँकेच्या विविध योजना सांगितल्या आणि महिला सभासद यांचे बँकेतील योगदानाबद्दल कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी महिलांना मान सन्मान मिळतो आहे. तो अधिक वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या कामातून आदर्श उभा केला पाहिजे याची जाणीव करून दिली.

स्वाती बांगडीया यांनी आधुनिक काळातील महिला आणि तिची विचारसरणी यावर मत मांडताना महिलांनी आपल्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत चिकाटी दाखवली पाहिजे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेणुका ओंबळे यांनी कायदेविषयक ज्ञान या विषयावर बोलताना महिलांना कोणत्या कायद्याविषयी ज्ञान असले पाहिजे या विषयी माहिती दिली. बँक कर्मचारी प्रतिमा यांनी बँकेच्या डिजिटल अँप ची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजक संजय संकपाळ संचालक शिक्षक बँक सातारा यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली याबद्दल आभार व्यक्त केले.

महिला शिक्षिका यांनी महाबळेश्वर येथे पहिल्यांदा महिला मेळावा आयोजित करून सन्मान केला व एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले म्हणून शिक्षक बँकेचे संचालक संजय संकपाळ यांना धन्यवाद दिले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित सर्व महिलांचा सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

हा महिला मेळावा यशस्वी होण्यासाठी सौ वैशाली कदम, दीपाली ढेबे, रुपाली कारंडे, संगीता उतेकर, तसेच तालुक्यातील अन्य महिला शिक्षिका व बँक कर्मचारी आकाश जाधव, आशिष भिलारे यांनी मेहनत घेतली..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता ढेबे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket