Home » राज्य » शेत शिवार » महिला दिनानिमित्त ट्रेकिंग स्पर्धा – साहस, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा संगम

महिला दिनानिमित्त ट्रेकिंग स्पर्धा – साहस, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा संगम 

महिला दिनानिमित्त ट्रेकिंग स्पर्धा – साहस, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा संगम 

महिलादिनाच्या निमित्ताने उत्कर्ष पतसंस्थेने ९ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या ट्रेकिंग स्पर्धेस संपूर्ण वाई तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील महिलांनी जोमाने सहभाग घेतला. 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वा. सोनजाई डोंगराच्या पायथ्याला स्पर्धेचे उद्घाटक मा श्री प्रशांत बाळासाहेब डोंगरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून झाली. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. निसर्गाच्या सानिध्यात, डोंगरदऱ्यांतून वाट काढत महिलांनी ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद घेतला. हा उपक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर महिलांमधील एकी आणि आत्मविश्वास वाढवण्यासही मदत करणारा ठरला. या उपक्रमामुळे महिलांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले असून, अशा साहसी आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन नियमित व्हावे, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आली. प्रमुख अतिथी श्री प्रशांत डोंगरे यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजकांनी पुढील वर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करावे अशी आशा व्यक्त केली. या स्पर्धेत गट क्र १ ( वय वर्षे २१ ते ३० ) मध्ये प्रथम क्रमांक शैला नवनाथ जायगुडे, द्वितीय क्रमांक अश्विनी विठ्ठल मोहिते, तृतीय क्रमांक अश्विनी किरण सकुंडे, स्पर्धेत गट क्र २ ( वय वर्षे ३१ ते ४० ) प्रथम क्रमांक दिपाली श्रीदत्त शिंदे , द्वितीय क्रमांक प्रमिला राजेंद्र सपकाळ, तृतीय क्रमांक वनिता सुनील इरनक, स्पर्धेत गट क्र ३ ( वय वर्षे ४१ ते ५० ) प्रथम क्रमांक मीना अर्जुन मगर, द्वितीय क्रमांक प्रतिभा विनोद सुतार, तृतीय क्रमांक संजीवनी धनराज बुन्द्गे, गट क्र ४ ( वय वर्षे ५१ ते ६० ) प्रथम क्रमांक छाया चंद्रकांत धुमाळ, द्वितीय क्रमांक गीता रामचंद्र मेरवा, तृतीय क्रमांक लता गजेंद्र पाटील, गट क्र ५ ( वय वर्षे ६० च्या वरील ) प्रथम क्रमांक विमल हनमंत सावंत, द्वितीय क्रमांक डॉ नीलिमा भोसले, तृतीय क्रमांक सुनंदा गाढवे यांनी यश संपादन केले. सर्व सहभागी व यशस्वी महिलांचे संचालक श्री अमर कोल्हापुरे यांनी कौतुक केले.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महिलादिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्रीमती अलका घाडगे,श्रीमती नीला कुलकर्णी तसेच संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड

Post Views: 66 वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कराड प्रतिनिधी (सुनील पाटील )-

Live Cricket