Home » Uncategorized » क्राईम डायरी » महिला कीर्तनकाराला डोक्यात दगड घालून संपवले; संभाजीनगर हादरले

महिला कीर्तनकाराला डोक्यात दगड घालून संपवले; संभाजीनगर हादरले

महिला कीर्तनकाराला डोक्यात दगड घालून संपवले; संभाजीनगर हादरले

 महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे सहावाजेच्या हत्येची ही घटना उघडकीस आली. या हत्याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत महिला कीर्तनकाराचे नाव संगीताताई अण्णासाहेब पवार (वय 50 वर्षे) असे आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितींनुसार हभप संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पूजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते. त्यांनी हभप संगीताताई पवार यांना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिरा शेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 296 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket