वाईत डिझेल खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्याने पाणी टंचाई कक्ष सापडला अडचणीत .ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट
वाई( शुभम कोदे)-राज्य सरकारच्या बेजबाबदार आणी गलथान कारभारा मुळे मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाणी टंचाई असणाऱ्या गावांना टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करण्या साठी लागणाऱ्या डिझेलला पैशाचा पुरवठा वेळेत केला जात नसल्याने पेट्रोल पंप चालकांची आधीची असणारी लाखो रुपयांची थकलेली बिले देण्यासाठी राज्य सरकारने पैसेच दिले नसल्याने वाई शहरातील कुठलाच पेट्रोलपंप चालक उधारीवर डिझेल देत नसल्याने टंचाईग्रस्त गावांना पाण्याचा पुरवठा कसा करायचा अशा अडचणीत हि यंत्रणा सापडली आहे .
वास्तविक पाहता संपुर्ण सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांन मधील गावांना सध्या पाणी टंचाईने ग्रासले आहे .याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर आहे.वाई तालुक्यातील या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्या साठी जिल्हाधिकारी आणी जिल्हा परिषदे मार्फत अवघे ३ टॅंकर पाठवले आहेत .ते वाईच्या पंचायत समिती कडे पोहचले आहेत .पण आलेले हे ३ टॅंकर रस्त्यावर चालविण्या साठी त्याला डिझेल लागते व डिझेल खरेदी करण्या साठी निधीची गरज असते.
पाणी टंचाई कक्षातील अधिकारी वर्गाला वाटल्याने पाणी टंचाई ग्रस्त गावांना तातडीने पाणी पुरवठा झाला पाहिजे गावकरी पाण्या पासुन वंचित राहु नयेत त्यांना पिण्याचा पाणी पुरवठा झालाच पाहिजे हा जनहिताचा आणी कर्तव्याचा चांगला उद्देश डोळ्या समोर वाईतील एका पेट्रोल पंप चालकाला विनंत्या करुन निधी येताच तुमचे सगळे बिल देवुन टाकु या बोलीवर विश्वास ठेवुन त्याने पुण्याइचे काम आहे हि भावना उराशी बाळगून दररोज उधार डिझेल देण्यास सुरवात केली महिना संपला तरी वाई पंचायत समितीने डिझेलची झालेली लाखो रुपयांची ऊधारी न दिल्याने डिझेलचा पुरवठा करणार नसल्याचा इशारा पंप चालकाने दिल्याने वाईचा पाणी टंचाई कक्ष कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न येथील अधिकारी आणी कर्मचाऱ्यांना पडला आहे .
राज्य सरकारने आणी जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून तातडीने निधी पाठवावा अशी मागणी वाई तालुक्यातील पाणी टंचाई असणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलताना केली आहे .
अभेपूरी, वडाचीवाडी,सुलतानपूर, शेलारवाडी,बोपर्डी,लोहारे,धावडी, गुंडेवाडी,पिराचीवडी, परखंदी, सटालेवाडी, मुंगसेवाडी, चांदक, आनंदपूर, केंजळ, गुलुंबं, वेळे, सुरूर्,कवठे, वहागाव, मोहरेकरवाडी,देगाव, लगडवाडी, मापरवाडी, वाकनवाडी, शिरगाव या परिसरात भीषण प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.