यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फुटबॉल संघ चॅम्पियनशिप चा विजेता
पॅकॅगन फुटबॉल क्लब आयोजित फुटबॉल फॉर ऑल डे चॅम्पियनशीप – 2024 मध्ये यशोदा पब्लिक स्कूलच्या वयोगट 14 गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी लीग स्पर्धेतील तीन मॅच अत्यंत खिलाडू वृत्तीने खेळल्या व या तीनही मॅच मध्ये विजय प्राप्त केला, त्यामुळे शाळेचा संघ फायनल मॅच साठी पात्र झाला. फायनल मॅच मध्ये किशोर पब्लिक स्कूल चा संघ सूर्या फुटबॉल क्लब, सातारा विरुद्ध खेळून दोन शून्य ने विजयी झाला.
या खेळासाठी यशोदा पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक तमन्ना शेख व मधुसूदन महाडिकयांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे, शाळेचे मुख्याध्यापक प्रदिश कलानगदन, क्रीडा प्रशिक्षक महाडिक आणि सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले.
तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते व या सर्वांनी संघातील खेळाडूंना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
