वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी
सातारा -वाई शहरापासून जवळ असणाऱ्या पांडवगडावर इंदापूर तालुक्यातील गिर्यारोहक पर्यटनासाठी आले होते.अचानक जंगली मधमाशांच्या टोळक्याने पर्यटांवर हल्ला चढविला.त्यातील दोघेजण बेशुद्ध अवस्थेत गेले.घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस व वाई तालुका वैद्यकीय पथकाने धाव घेतली.गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्यद्री अकॅडमीचे खरात सर तातडीने पांडव गडावर गेले.परंतु जखमींना खाली आणणे सोयीचे होत नव्हते. दिशा अकॅडमी चे प्रा.डॉ नितीन कदम सर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दिशा शिवसह्यद्री रेसक्यु टीम पांडव गडावर पाठवली.प्रा.धनंजय यादव व प्रा.निलेश मोरे टीम बरोबर पांडव गडावर गेले व तातडीने खरात सर व प्रशांत डोंगरे रोहीत मुंगसे आणि रेसक्यु टीम ने जखमींना गडा खाली आणले. त्यांना पुढील उपचारा साठी वाई ग्रामीण रुग्णालयात आणले.
