Home » Uncategorized » हायवेवरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे अपघातात तरुणी जागीच ठार युवक गंभीर जखमी

हायवेवरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे अपघातात तरुणी जागीच ठार युवक गंभीर जखमी

हायवेवरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे अपघातात तरुणी जागीच ठार युवक गंभीर जखमी

पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे खड्डा चुकविण्यासाठी वेग कमी केल्याने दुचाकीला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात युवती जागीच ठार झाली, तर युवक गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी दि.१२ रोजी महामार्गावरील शिंदेवाडी परिसरात रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्यासाठी दुचाकीचा (क्र. एम. एच. ०१- डी. जे. ८३६५) वेग अचानक कमी केला. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकची (क्र.पी.बी.०६-ए.यु.९९९५) दुचाकीला जोरदार धडक बसली.

यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती रुबल सिन्हा (वय-२६वर्षे, रा. ओडीसा, सध्या रा.पुणे) ही गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली, तर दुचाकीचालक शहाऊद शेख (वय-३३ वर्षे, रा. सय्यद मोहल्ला, एरंडोल, जळगाव, ता. जि. जळगाव) हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती कळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव, पोलीस अंमलदार अरविंद बाहऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे व शिरवळ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 23 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket