Home » Uncategorized » क्राईम डायरी » वाईच्या जिल्हा न्यायालयाने कवठे येथील अमोल खरात याला सुनावली ७ वर्षांची शिक्षा

वाईच्या जिल्हा न्यायालयाने कवठे येथील अमोल खरात याला सुनावली ७ वर्षांची शिक्षा

वाईच्या जिल्हा न्यायालयाने अमोल खरात याला सुनावली ७ वर्षांची शिक्षा

वाई प्रतिनिधी –कवठे येथील अमोल अशोक खरात याला लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी वाईच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली. 

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १९ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता. कवठे ता. वाई गावचे हद्दित आरोपी अमोल अशोक खरात याने पिडीतेस उचलून घेवून जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत भुईज पोलीस ठान्यात गु.र.नं ४७/२०१३ पोस्को कायदा कलम ४८ – १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे तपासा दरम्याण आरोपी अमोल अशोक खरात वय – २७ वर्ष रा. कवठे ता. वाई जि. सातारा याचे विरुध्द तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि एन. व्ही. पवार भुईज पोलीस ठाणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

      सदर खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश, वाईचे न्या. आर. एन. मेहेरे, यांचे न्यायालयात पुर्ण होवून सरकारतर्फे अतिरीक्त, सरकारी अभियोक्ता डी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले आहे. सदर केस मध्ये

एकूण ७ साक्षीदार तपासले, परिस्थीतीजन्य पुरावा व साक्षीदार यांचे साक्षीवरुन न्यायालयाने आरोपी अमोल अशोक खरात याला दोषी ठरवून त्यास सदर गुन्हयात ७ वर्ष शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरलेस १५ दिवस साधी कैद हि शिक्षा सुनावली आहे.

   सदर केस कामी भापोसे पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचीम, यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, तत्कालीन तपासी अंमलदार स.पो.नि.श्री.एन.व्ही. पवार, पैरवी अंमलदार म.पो.कॉ. घोरपडे, पो.कॉ. आगम यांनी योग्य ती मदत केली आहे. तपासी अंमलदार तसेच प्रोसीक्युशन स्कॉडचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 19 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket