वाईच्या भिमनगर येथील भिमसैनिकांच्या सर्व संघटनांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे अतिक्रमण मोहीम अखेर थांबली
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई शहरातील वाई सातारा आणी वाई पुणे या तिकाटण्यात गेली ५० वर्षांपासून झोपड्या बांधून शेकडो मोलमजुरी करून शेकडो भिमसैनिक आपल्या कुटुंबियांन सोबत राहण्यासाठी आहेत.तेथे राहण्यार्यांची हि दुसरी पिढी आहे .याच वसाहती मधील शेकडो झोपड्या तोडण्यासाठी दि .२४ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पणे या भिमनगर जवळ शेकडोंच्या संख्येने प्रशासनाने आणलेल्या पोलिसांच्या ताफा पोलिस गाड्यांन मधुन उतरविण्यात आला हे पाहताच येथील रहिवाशान मध्ये संतापाची लाट उसळली आणी बायका पोरांना घेऊन येथील माणसं हातात आरपीआयच या संघटनेचे झेंडे घेऊन त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला .बघता बघता वाई तालुक्यातील शेकडो भिमसैनिक वाईच्या या तिकाटण्यातील भिमनगर वाचविण्यासाठी दाखल झाले .
पण या घटनेचे रुपांतर लाठीचार्ज मध्ये होवू नये याची खबरदारी घेण्या साठी आरपीआयचे नेते अशोक गायकवाड स्वप्नील गायकवाड व इतर प्रमुख कार्यकर्ते घटना स्थळावर दाखल होवून वाई पोलिस ठाण्यातील परिविक्षाधीन डिवाय एसपी श्याम पानेगावकर सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल गवळी व इतर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा विषय शांततेच्या मार्गाने मिटावा असा तोडगा काढण्याची विनंती केली व अतिक्रमण असणाऱ्या गटाची प्रथम मोजणी करुण किती झोपड्या अतिक्रमणात येतात याची जमीन मालकांने खात्री करावी अशी मागणी केली .पण उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने पोलिस प्रशासनाला देखील यात काही करणे अशक्यच होते .
उच्च न्यायालयाचे आदेश पाळणे एवढेच पोलिस प्रशासनाच्या हातात असल्याने प्रशासनाने अतिक्रमणातील झोपड्या तोडण्यासाठी जिसीपी ट्रेक्टर अग्निशमन यंत्रणा घटना स्थळावर सज्ज ठेवली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही या साठी वाई पोलिसांनी पुरेपुर काळजी घेतल्याचे यावेळी दिसुन आले होते.हि वसाहत यशवंत नगर ग्रामपंचायत हद्दी मध्ये येते . येथील रहिवाशांनसाठी या ग्रामपंचायती मार्फत लाईट आणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र देखील पुरविण्यात आलेली आहेत तर ग्रामपंचायत निवडणुकीत याच वसाहती मधील रहिवाशी असणाऱ्या कायम उमेदवारी देऊन त्यास निवडुन देखील आणले जाते .
असा इतिहास या भिमनगर वसाहतीचा आहे .
हि जागा खाजगी मालकीची आहे या जागे बाबत मुंबई उच्च न्यायालयात गेल्या कित्येक वर्षांपासून केसेस चालु आहेत .त्याचाच आधार घेऊन जमीन मालकांने येथील वसाहत हि बेकायदेशीर व अतिक्रमण करून वसलेली आहे असा जमीन मालकाचा दावा आहे ति जागा मुळ मालकाला कायदेशीर मार्गाने परत मिळविण्या साठी पुर्वी अनेकदा तडजोडींचे प्रयत्न देखील झाले पण त्यावेळीही आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तिव्र आंदोलने करून या वसाहतीला आज अखेर जिवदान दिले हे तितकेच खरे आहे.आज तरी हि मोहीम थांबली आहे . अतिक्रमण हटविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा वाई तालुक्याच्या जनतेला पहिल्यांदाच पाहावयास मिळाल्याने वाई तालुक्यात यांची चर्चा जोमाने सुरू आहे .
