Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सच्या उद्घाटनाचा सोहळा 26 जानेवारीला

वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सच्या उद्घाटनाचा सोहळा 26 जानेवारीला

वाईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सच्या उद्घाटनाचा सोहळा 26 जानेवारीला

वाई प्रतिनिधी -वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील क्रीडारसिकांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट्स 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता क्रीडाप्रेमींना समर्पित केले जाणार आहेत.

हा भव्य उद्घाटन सोहळा किसन वीर महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्ट्स हॉलमध्ये होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा मा. छ. वृषालीराजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे माजी आमदार मा. श्री. मदनदादा भोसले भूषवणार आहेत.

या बॅडमिंटन कोर्ट्सच्या उभारणीमुळे वाई शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त या कोर्ट्समध्ये खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध होईल. क्रीडाक्षेत्रासाठी झटणाऱ्या वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालयाने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी वाईतील क्रीडाप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाई जिमखान्याचे अध्यक्ष श्री अमर कोल्हापुरे यांनी केले आहे. वाईच्या क्रीडा इतिहासाला नवा अध्याय देणाऱ्या या सोहळ्यामुळे तरुणाईला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे शहराच्या क्रीडाक्षेत्राला नवी ओळख मिळणार असून, भविष्यात वाईला क्रीडानगरी म्हणून नावारूपाला आणण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 39 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket