वाडे फाटा ते शिवथर रस्त्याची डागडुजी
सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा
शिवथर.(सुनिल साबळे)सातारा लोणंद रस्त्यावर लोणंद ते वाढे फाटा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता तसेच याच रस्त्यावर खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला होता काहींना पाय बंदी व्हावे लागले आहे त्यामुळे याबाबत दखल घेऊन सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील देखभालीचे रखडलेले काम सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी मदन साबळे यांनी संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला तसेच भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी पंकज प्रसाद साहेब व किशोर साहेब यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. यांच्या सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजी उत्तमप्रकारे करतोय , असे पंकज प्रसाद साहेब यांनी सांगितले.
या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार उदयनराजे यांनी वेळोवेळी सहकार्य केले.प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या.
मदन भिमाजी साबळे जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा





