स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त
सातारा| दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी स्वर श्रद्धांजलीच्या माध्यमातून गायनसेवा करणे हा एक आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस यांनी केले
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे स्वरश्रद्धांजली हा संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तेव्हा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिरीष चिटणीस बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद फडके, डॉक्टर लियाकत शेख उपस्थित होते.
शिरिष चिटणीस म्हणाले,साताऱ्यात शास्त्रीय संगीत क्षेत्रात खूप गुणवत्ता आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळते दीपलक्ष्मी पतसंस्था नेहमीच अशा आदर्श उपक्रमाच्या पाठीशी उभी राहील.यावेळी मुकुंद फडके म्हणाले,सातारच्या शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर असलेले सर्व तारे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही मोठी लक्षणीय गोष्ट आहे सातारमधील गुणवत्ता एकाच मंचावर आली आहे.डॉ.लियाकत शेख यांनीही उपक्रमाचे कौतुक केले आणि आपला स्टुडिओ सर्व कलाकारांसाठी कधीही उपलब्ध असल्याचे सांगितले
यावेळी दत्तात्रय डोईफोडे, संजय दीक्षित, उज्वल गोडबोले, प्रज्ञा लाटकर,स्वरदा राजोपाध्ये, वैभव फडतरे, पियुशा भोसले ,अथर्व रत्नाकर,स्वरा किरपेकर, शर्वरी जोशी, जान्हवी माळी यानी संगीत सेवा केली.शास्त्रीय गायन,व्हॉयलीन वादन, तबला वादन,पेटी वादन सादर करून कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुधीर पाध्ये, राजेंद्र आफळे, विश्वनाथ पुरोहित, सागर जोशी, सचिन राजोपाध्ये, अमेय देशपांडे,अथर्व रत्नाकर, प्रज्वल जाधव, स्वरा किरपेकर, चैतन्य पटवर्धन यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन राजेंद्र आफळे यांनी केले.
