व्हिजन सातारच्या स्वप्नपूर्तीसाठी मंत्र्यांची वज्रमूठ हावी – श्रीरंग काटेकर
सातारा – स्वतंत्र प्राप्तीनंतर प्रथमच सातारा जिल्ह्याला राज्याच्या राज्य मंत्रिमंडळात चौघांना कॅबिनेट दर्जाचा सन्मान प्राप्त झाला आहे त्यामुळे या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून सातारच्या जिल्हा वासियांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत प्रगती व विकासाची तोरणे नव्याने बांधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बळ दिले आहे त्यामुळे या मंत्र्यांकडून विशेषता बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले ,ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे., पर्यटन मंत्री ना.शंभूराजे देसाई तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्याकडे असणाऱ्या विविध खात्यातून सातारा जिल्ह्याचा चौफेर प्रगती घङावी ही सातारावासीयांची अपेक्षा आहे या अपेक्षा पूर्तीच्या अंमलबजावणीसाठी हे मंत्री दिवस रात्र परिश्रम घेऊन जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने समृद्ध घडवतील ही अपेक्षा आहे जिल्ह्यातील मूलभूत समस्या व त्यावर उपाय याबाबत चारही मंत्री एकत्रित विचार विनिमय करून जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिलेले प्रगतीचे स्वप्न साकार व्हावे ही अपेक्षा आहे याविषयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा यांचा विशेष लेख….
जिल्ह्यातील समस्यांच्या सोडवणुकीचे जो मंत्री तोरण बांधेल त्याच्याच पाठीशी जनतेने खरे तर खंबीर उभे राहावे आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न रोजगार बेरोजगारीचा असून येथील तरुणाई नोकरीच्या शोधासाठी मुंबई पुणे व अन्य शहरावर अवलंबून आहे सातारच्या औद्योगिक विकासाची चक्र गतिमान करण्यासाठी यापूर्वी कोणत्याही ठाम भूमिका घेता आली नाही त्याचबरोबर जिल्ह्यातील धरणग्रस्त जनतेच्या वेदना व व्यथा कडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना त्याकडे होत असलेले दुर्लक्ष भयावय आहे आज विस्थापित झालेल्या नागरिकांची दयनीय अवस्था खूप खालावली आहे याबाबत खरे तर मंत्र्यांकडून ठोस भूमिकेची अपेक्षा आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील वाहतूक समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक रस्ते अपघातात बळी पडत आहेत विशेषता महामार्गावर वाहतूक व्यवस्था उत्तम व्हावी यासाठीचे धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणीची अपेक्षा मंत्र्यांकडून आहे जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढीबाबत ठाम भूमिका घेऊन उद्योग व्यवसायाला चालना देणारे प्रकल्प निर्मिती साताऱ्यात मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे एकविसावे शतक हे ज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे असे असतानाही जिल्ह्यात एकही आयटी पार्कची उभारणी होऊ शकली नाही औद्योगिक प्रगती बाबतचे कोणते धोरण नसल्याने मतदार वर्गात नाराजी सुर उमटत आहे. जिल्ह्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत विशेषता आरोग्यसेवा बाबत जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेलसांङ व होत असलेली दुर्लक्ष याबाबत प्रामुख्याने सुविधाचा अभाव औषध उपचाराचा तुटवडा तज्ञ डॉक्टरांची कमतरता स्वच्छतेचा अभाव कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या याकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावे जिल्हा रुग्णालयात मशिनरीचा तुटवड्यामुळे आरोग्य चाचणी करण्यासाठी खाजगी लॅब वर सर्वसामान्य नागरिकांना अवलंबून राहावे लागते जिल्हा रुग्णालयात उत्तम दर्जाची सुविधा देण्याबाबत मंत्र्यांकडून अपेक्षा आहेत तसे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठीचे धोरणात्मक आराखडे खरे तर मंत्र्यांकडे असणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे जिल्ह्यातील टोलनाके हे वसुली नाके झाले आहेत जिल्हा वासियांना टोलमुक्तीचे भूत कधी उतरणार याबाबत मंत्र्यांनी ठाम आश्वासन देणे आवश्यक आहे टोलचा झोल वाहतूक दराच्या मानगुटीवर बसला आहे. अनेक भागात दळणवळणाची अदयाप सोय झाली नाही तसेच अनेक भागात पिण्याच्या पाण्याची सोय ही झाली नाही या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणे मंत्र्यांचे खरे तर कर्तव्य आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा बरोबरच सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा सहकार आणि राजकीय मोठा वारसा लाभला आहे सातारा जिल्हयाचे भूमिपुत्र आणि देशाचे थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेला हा जिल्हा तसेच क्रांतिकारचा जिल्हा अशी ही देशपातळीवर ओळख असणार्या सातारा जिल्ह्याने असंख्य रत्ने घडवली हा इतिहास आहे एकेकाळी या जिल्ह्याचा देश पातळीवर दरारा होता विकास व प्रगतीची कामे गतिमानतेने मार्गी लागत होती काळाच्या ओघात धडाडी व धाडसी नेतृत्व लुप्त पावल्याने जिल्ह्याचे असंख्य नागरी प्रश्न आता प्रलंबित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे सहकार रत्न स्वर्गीय यशवंतराव मोहिते स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले माजी ग्रामीण विकास मंत्री प्रतापराव भोसले बरोबरच स्वर्गीय खासदार लक्ष्मण तात्या पाटील केशवराव पाटील माजी मंत्री चिमणराव कदम खासदार प्रेमलताताई चव्हाण पी डी पाटील लोकनेते बाळासाहेब देसाई मदन आप्पा पिसाळ अदि नेत्यांनी विकासात्मकतेचा ध्यास घेऊन जिल्ह्याचा नांवलौकिक राज्य पातळीवर वाढविला देशाचे व राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या येथील भूमिपुत्रांनी जेव्हा जेव्हा देशावर संकट आले त्या त्यावेळी ते क्षमतेने ठाम उभे राहिले विशेषता भारत चीन युद्धाच्या कठीण व प्रतिकूल परिस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा कणखरपणा दाखवून दिला तोच बाणा कायम ठेवत पुढे वाटचाल करणारे सातारचे भूमिपुत्र उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील मातीतील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या रूपाने राज्याची धुरा यशस्वीपणे संभाळली राजकीय वारसा पुढे घेऊन जाताना माजी सहकार मंत्री स्वर्गीय श्रीमंत अभयसिंह राजे भोसले स्वर्गीय विलासकाका उंडाळकर भाऊसाहेब गुंदगे राज्य क्रीडामंत्री स्वर्गीय शाम अष्टेकर अदि ज्येष्ठ नेत्यांबरोबरच माजी बाधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील पालकमंत्री पदाचा बहुमान मिळवणारे नामदार शशिकांत शिंदे शंभूराजे देसाई बाळासाहेब पाटील यांच्याकडे सत्तेच्या चाव्या असतानाही जिल्ह्याची असंख्य प्रश्नांची उकल होत नाही हे खरे तर दुर्दैवी बाब आहे चार मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आजही विकासापासून वंचितच राहिल्याचे विदारक चित्र येथील जनतेला अनुभवायला मिळते.
– सातारा कास मार्ग चिपळूण दळणवळण सेवा सुविधा प्रलबित राहल्याने दोन्ही जिल्ह्याचा विकास खुंटला आहे या मार्गाचे काम जलद गतीने झाल्यास सातारची औद्योगिक सामाजिक व्यसाईकतेला गती येईल त्याचबरोबरच पर्यटन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यातील गड किल्ल्यांची सुशोभीकरण केल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल त्याचबरोबर सातारा पुणे लोकल रेल्वे सेवेचा प्रश्न तातडीने दूर केल्यास जिल्ह्याच्या प्रगतीला ते पूरक ठरेल व देवान घेवाण करणे सोयीचे होईल.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा