वाई वनविभागाची धडक कारवाई तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)-वाई वनविभागाला आज रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौजे लोहारे,ता.वाई येथील लोहारे परखंदी रस्त्यावर फिरती व तपासणी करत असताना विजय बाळू कोचळे ,रा.पसरणी ता. वाई हे करंज, आंबा ई. रायवळ प्रजातीची झाडे विनापरवाना तोडून त्यापासुन तयार केलेला लाकुडमाल टाटा कंपनीच्या 407 मॉडेलचा टेम्पो क्र.MH-08 W- 0741 मधून वाहतुक करत असताना वाई वनविभागाच्या पथकाने धाड टाकुन पकडला व सुरक्षेच्या कारणास्तव वनक्षेत्रपाल वाई कार्यालयाचे आवारात नेवुन लावला. सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे. सदर कारवाईत एकुण 3,02,907 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा.वनसंरक्षक सातारा प्रदीप रौंधल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई एम. एन. हजारे साहेब, वनपाल वाई एस.आर.मोरे, वनरक्षक वाई एस.एस.चौगुले,वनसेवक संजय चव्हाण यांनी पार पाडली.
