प्रेझेंटेशन कौशल्ये प्राप्त विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल – डॉ.अनिरुद्ध जगताप
गौरीशंकर देगाव फार्मसी मध्ये राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
साठ स्पर्धकांचा सहभाग ,,विजेत्या स्पर्धकांना गौरविले
देगाव – स्पर्धात्मक युगात सर्व क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन कौशल्ये प्राप्त करणे गरजेचे आहे असे मत गौरीशंकर चे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप यांनी व्यक्त केले ते देगाव ता. जि. सातारा येथील गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या 17 व्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर ,
डॉ. सीमादेवी कदम, डिप्लोमा विभाग प्रमुख डॉ. अविनाश भोसले, प्रा. स्पर्शा बांदेकर, प्रा. ज्योती सलगर, प्रबंधक हेंमत काळे अदि प्रमुख उपस्थित होते.
डॉ. अनिरूध्द जगताप पुढे म्हणाले की औषध निर्माण क्षेत्रातील ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुढील काळात गुणवत्तेबरोबरच व्यवसाईक कौशल्ये वाढीण्यासाठी प्रेझेंटेशनचे कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे .
प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर म्हणाले की भाषा प्रभुत्व संवाद बरोबरच ज्ञान कौशल्याची जोड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी महाविद्यालयाने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविणे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हाच या स्पर्धेमागे मुख्य हेतू होता.
सोशल मीडिया अँड टुडेज या विषयावर आयोजित केलेल्या स्पर्धेला राज्यभरातील विविध फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये शिवानी संतोष धनवडे कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळविला तर वैष्णवी सुभाष घाडगे गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच तृतीय क्रमांक अलिना बशीर कडवेकर कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड मिळवला तर उत्तेजनार्थ डॉ.डी वाय पाटील फार्मसी कॉलेज कोल्हापूर येथील अपेक्षा चित्रे हिला गौरविण्यात आले.
या स्पर्धेत राज्यभरातून 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी डॉ. हर्षदीप जोशी बाटु विद्यापीठ लोणेरे व डॉ. अजित एकल फाउंडर इन्स्टाविजन लॅबोरेटरी अँड सर्व्हिसेस यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कु.दिशा फडतरे कुमारी, आकांक्षा पवार यांनी केले.आभार प्रा. स्पर्शा बांदेकर यांनी मानले.
