Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वीरशैव लिंगायत मठ संस्थान व शिष्य ,भक्त परिवार वाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवारी वाई येथील साठे मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम

वीरशैव लिंगायत मठ संस्थान व शिष्य ,भक्त परिवार वाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवारी वाई येथील साठे मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम

वीरशैव लिंगायत मठ संस्थान व शिष्य ,भक्त परिवार वाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवारी वाई येथील साठे मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम

केळघर प्रतिनिधी:वीरशैव लिंगायत मठ संस्थान व शिष्य ,भक्त परिवार वाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवारी (ता:१०)वाई येथील साठे मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत मठ संस्थानचे मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी दिली.

महादेव शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा ) निमित्त गुरूवारी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.यावेळी सकाळी सात वाजता गुरू गादीस रुद्राभिषेक ,इष्टलिंग महापूजा,श्री. गुरू पाद्यपूजा, सकाळी नऊ वाजता शिव दीक्षा विधी,सकाळी दहा वाजता गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या शिष्यांचा सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.सकाळी अकरा वाजता शिष्यांचे मनोगत होणार आहे.दुपारी बारा वाजता गुरू महाराजांचे आशिर्वचन होणार असून दुपारी एक वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.अन्नदान श्रीमती चंपाबाई उंबरकर आणि उंबरकर परिवार पुणे यांच्यातर्फे होणार आहे.गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरू महाराज, नरेंद्र महाजन,रवींद्र भिसे, सचिन जंगम ,सिद्धराम मातारे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वीरशैव लिंगायत मठ संस्थान वाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 90 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket