वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)मौजे चांदवडी (ता. वाई) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत आमदार मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांचे हस्ते करणेत आले.
बुद्ध विहारास जोडणारा रस्ता हा विकासाबरोबरच सम्यक शांतीचे प्रतीक आहे. विविध जाती – धर्माच्या व्यक्तींना विकासकामांद्वारे जोडणे हा आमचा सामाजिक अजेंडा आहे. त्या दृष्टीने चांदवडीतील ग्रामस्थांसाठी सातत्याने विकासाचे पर्व घेऊन आम्ही सक्रिय आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून चांदवडी गाव सातत्याने प्रगतीपथावर राहावे म्हणून आमच्या कुटुंबाने आणि नेतृत्वाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही चांदवडीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे उद्गार नितीन काका पाटील यांनी काढले.
या कार्यक्रमास किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे (दादा), चांदवडी गावच्या सरपंच फरीदा अहमद शेख, उपसरपंच रामदास शिंदे, संतोष शिंदे, यमुना सर्जेराव काकडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्नेहल अमोल शिंदे, सौ. रेखा संतोष शिंदे, माजी सरपंच सुनील शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मोरे, अमोल विठ्ठल शिंदे, नरेश सहदेव वाघ, राजेंद्र किसन शिंदे, प्रकाश पाटलू शिंदे, दत्तात्रेय बाळासाहेब पोळ, अनिल जाधव, विनोद जाधव, रफिक शेख, रमजान शेख, रितेश काकडे, विजय काकडे, सूरज ओंबळे, अनिकेत ओंबळे, मंदार काकडे, मच्छिंद्र पोळ तसेच चांदवडी व वेलंग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.