Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रतिसरकारचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे – वैभव नायकवडी

प्रतिसरकारचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे – वैभव नायकवडी

प्रतिसरकारचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे – वैभव नायकवडी

सातारा / प्रतिनिधी:  सातारा प्रतिसरकारणे स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले. ते सातारा येथे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी १९४४ साली सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या १० सप्टेंबर “शौर्य दिना” निमित्त सातारा मध्यवर्ती जेल (कारागृह) येथे बोलत होते.   

         पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीने या विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सातारा येथील प्रतिसरकार समन्वय समितीचे प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजी जाधव, विजय मांडके, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मस्के, विजय निकम, स्वातंत्र सैनिकांचे अनेक वारसदार तसेच हुतात्मा शिक्षण उद्योग समूहातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र सेना उभी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे ध्येय होते. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने सशस्त्र क्रांती केली, या आंदोलनामध्ये त्यांना ब्रिटिशांच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर सातारा येथे कारावासात असताना १० सप्टेंबर १९४४ रोजी अभेद्य अशा १८ फूट उंचीच्या जेलच्या (तुरुंगाच्या) भिंतीवरून उडी मारून डॉ. नागनाथ अण्णा भूमिगत झाले. तत्कालीन इंग्रज सरकारला सामान्य जनता आणि क्रांतीवीरांनी सळो की पळो करून सोडले होते, त्यानंतर ते देश स्वतंत्र होईपर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. या घटनेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस “आपण शौर्य ” दिन म्हणून आपण साजरा करतो, स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न करावेत. सर्व क्रांतिवीरांना मी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो, त्यानिमित्त त्यांचे विचार नव्या पिढीला देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. आजही देश उभारणीसाठी नवीन तरुणांनी त्याग, देशप्रेम नजरेसमोर ठेवून देशाच्या उभारणीसाठी वाटचाल केली पाहिजे. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. 

तो आपण विसरता कामा नये. ती स्पूर्तीच खरी आपली प्रेरणा आहे. समाजकारण व राजकारणामध्ये काम करताना स्वातंत्र्य आबादीत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तशी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. क्रांतिवीरांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. आपल्यासमोर असलेल्या अडचणींशी सामना करताना आपण अखंडपणाने लढूया. असे त्यांनी यावेळी सांगितले.

         प्रारंभी वैभव नायकवडी यांनी सर्व मान्यवरांच्या समवेत विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून पुष्पांजली वाहिली. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी केले. या कार्यक्रमासाठी हुतात्मा बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर, वाळव्याचे लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे, अजित वाजे, संभाजी थोरात, अशोक मारुती खोत, भगवान अडीसरे, नारायण करांडे, गणेश खोत, विश्वास मुळीक, दिलीप सूर्यवंशी, जयकर चव्हाण, शरद थोरात, शरद खोत, विक्रम पाटील, चंद्रकांत पाटील, सुखदेव नवले, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मारक समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे: श्रीरंग काटेकर

स्वसंरक्षणासाठी मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे: श्रीरंग काटेकर गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन: ६० मुलींचा सहभाग.  लिंब :बदलापूर

Live Cricket