वारी पंढरीची सेवा वसुंधरेची
शनिवार दि.६ जुलै रोजी भुईंज येथील सायकल वे डे यांच्या सायकल वारीचे पंढरीकडे प्रस्थान
भुईंज : पत्रकार महेंद्रआबा जाधवराव
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि पंढरपूर सायकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक आणि आरोग्य संवर्धक या सायकल वारीमध्ये यावर्षीही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अंदाजे १५०० सायकलिस्टची नोंद झाली आहे.
भुईंज येथील सायकल वे डे असोसिएशनचे सदस्य सलग तिसर्या वर्षी या वारीमधे सहभाही होण्यासाठी जात आहेत.
प्रत्येक वर्षी पर्यावरण पुरक वारी आणि समाज प्रबोधन करत मार्गस्थ होणार्या सायकल वारीमध्ये पाणी वाचवा , निसर्ग वाढवा आणि निसर्ग वाचवा ही संकल्पना मनी धरुन सायकल वे डे चे अध्यक्ष श्री अनिल लोखंडे आणि उपाध्यक्ष सुनिल शेवते काही विशेष , काही खास उपक्रम राबवणार आहेत.
त्याबद्दल अधिक माहीती देताना त्यांनी सांगितल की,
आमच्या सायकल वारीमध्ये वय वर्षे ६ ते वय वर्षे ७० या वयोगटातील २५ जण सामील आहेत. संपूर्ण सायकल प्रवासादरम्यान आम्ही जवळपास ५०० सीड बाॅल बनवलेले आहेत. त्यांचे पिलीव घाट दरम्यान विसर्जन करण्यात येईल.
संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही आमच्या सायकल वर असणार्या पाण्याच्या बाॅटल सोबत आणलेल्या जार मधील पाण्याने भरणार आहोत, त्यामुळे एक ही पेट बाॅटल रस्त्यावर अथवा निसर्गात पडणार नाही. ( प्लॅस्टिक कचरा निर्मूलन )
पिण्याचे पाण्याच्या जार सोबत स्टीलची फुलपात्र आणणार आहोत. १ ही प्लॅस्टीक ग्लास वापरणार नाही.
तसेच पाणी पिण्यासाठी फुलपात्र असलेने आम्ही पाणी सुद्धा वाया जावू देणार नाही.
१८० कि.मी च्या प्रवासात चाॅकलेट , कुरकुरे , बिस्कीट किंवा आणखी कसलाही कचरा रस्त्यावर न फेकता आमच्या ट्रक मधे आम्ही कचरा पेटी ठेवणार आहोत.
वरील बाबी अगदीच शुल्लक असतील तरीही निसर्ग आणि पाणी संवर्धन आणि निर्मुलन साठी आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.
आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी , सदस्य यांचे मोलाची साथ आणि मार्गदर्शन ही आमची जमेची बाजू असून सचिव ओंकार ठोके यांचे अथक परिश्रम संघभावनेला मजबूत बळकटी देतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर बेंगलोर येथे नोकरी निमित्त स्थायिक असलेले श्री सचिन पवार तसेच हंगेरी या देशात नोकरी निमित्त असलेले श्री गोविंद काळे आणि मंगेश दळवी हे भारतात सुट्टीसाठी आलेले आहेत. दरवर्षी हंगेरीत मोबाईल मधून सायकल वारीचा अनुभव घेणारे ३ र्या पंढरपूर सायकल वारीसाठी पुण्याहून भुईंज मधे येणार असून आपल्या ग्रुप सोबत सायकल प्रवास करणार आहेत.
या वर्षी जेष्ठ नागरिकांची ही आम्हाला साथ लाभली आहे . आपल्या गावचे श्री शि. पा भोसले गुरुजी आणि शिरगाव येथील रिटायर्ड A.C.P. श्री बाजीराव भोसले. यांचीही साथ आहे.
तसेच वाई येथील व पुणे येथे क्रीडा शिक्षक असणारे श्री वरुण गोंजारी सर आमच्यासोबत आहेत. याचाच अर्थ आमचा उपक्रम १०० % योग्य मार्गावर आहे. आणि या सर्वांचा अनुभव आमच्या सायकल वारीत कामी येईल.
शनिवार दि. ६ जुलै रोजी सकाळी ५ वाजता या सायकल वारीचे भुईंज येथील श्री महालक्ष्मी मंदीर येथून प्रस्थान होणार आहे.
या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी भुईंज ग्रामपंचायतीचे स्वच्छता दूत श्री रामदास घाडगे हे हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या प्रसंगी उपस्थित रहावे असे आव्हान सायकल वे डे असोसिएशनच्या सागर दळवी व सर्व सभासदांनी केले आहे.