वि .ग माने हायस्कूल वसंतगडचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कराड -वसंतगड ता.कराड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री विठ्ठल गणोजी माने हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन एम एम एस )परीक्षेत यश मिळविले गुणवत्ता निवड यादीमध्ये 5 विद्यार्थ्यांचा समावेश झाला तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 22 विद्यार्थी पात्र झाले राष्ट्रीय शिष्यवृत्ती गुणवत्ता निवड यादीत चमकलेले विद्यार्थी.
अनुष्का माणिक संकपाळ, श्रेया दत्तात्रय कदम, सायली दत्तात्रय गुरव सई अजित काटकर, श्रेयश सर्जेराव कांबळे
या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12000 याप्रमाणे चार वर्षात 48 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 9600 प्रमाणे चार वर्षात 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे एकूण शिष्यवृत्ती 10 लाख 84 हजार 800 रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना किशोरी लोहार ,निलिमा चव्हाण ,वेताळ मॅडम श्री . संजय गोतरणे , शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले
सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थेचे सचिव रघुनाथराव नलवडे ,उपाध्यक्ष महिपती कोकरे ,हणमंतराव नलवडे ॲड . अमित नलवडे, चंद्रकांत पाटील,तानाजी वाघमारे,मुख्याध्यापक दीक्षित सर तसेच सर्व संचालक पालकांनी अभिनंदन केले.
