Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » उत्तरा जेष्ठ नागरिक संघ,उडतरेची 89 वी मासिक सभा उत्साहात संपन्न

उत्तरा जेष्ठ नागरिक संघ,उडतरेची 89 वी मासिक सभा उत्साहात संपन्न

उत्तरा जेष्ठ नागरिक संघ,उडतरेची 89 वी मासिक सभा उत्साहात संपन्न

सातारा -उत्तरा जेष्ठ नागरिक संघ,उडतरेची 89 वी मासिक सभा  1 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी विलास साहेबराव बाबर यांच्या अध्यक्षतेखाली काळेश्वर मंदिर,उडतरे येथे पार पडली.लेखक ,नवकवि व ग्रुप ऑफ सातारा हॉस्पीटल, सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे पब्लिक रिलेशन मॅनेजर श्रीकांत देशमुखहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या उपस्थित सदस्यांचे वाढदिवस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साजरे करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीकांत देशमुख यानी “ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी आरोग्य”या विषयावर समजेल असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

संघाचे नुतून अध्यक्ष सर्जेराव जाधव गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली, संघाचे सचिव प्रकाश विष्णू बाबर यांनी अहवाल वाचन केले तर उपाध्यक्ष दिलीप जगताप यांनी आभार मानले. मा.सरपंच उडतरे, श्री प्रविण बाबर, उद्योजक,समाजसेवक यांचे सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन नेहमी करीत असतात. या वाढदिवसानिमित्त सर्व सदस्यांना अल्पोपहार देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान

Post Views: 50 महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान सातारा -(अली मुजावर) सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर आणि

Live Cricket