उत्कर्ष पतसंस्था आयोजित महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी गिर्यारोहण स्पर्धा
वाई प्रतिनिधी :उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई दरवर्षी महिला दिना निमित्त महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी संस्थेने महिलांसाठी गिर्यारोहण स्पर्धा “उत्कर्ष हिरकणी” आयोजित केली आहे.महिला हि प्रत्येक कुटुंबातील एक महत्वपूर्ण व्यक्ती असते , जिने स्वतःच्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. निरोगी आरोग्य जीवनशैली च्या जागरुकतेसाठी संस्थेने या स्पर्धेचे नियोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन वाई मधील नामांकित डॉक्टर व रोटरी क्लबच्या अध्यक्षा मा प्रेरणा ढोबळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतर राष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्रीमती उषाताई पागे वय वर्षे ८० व श्री आशिष माने हे उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धा २१ वय वर्षाच्या पुढील सर्व महिलांसाठी आयोजित केल्या असून, ५ गटात स्पर्धा संपन्न होणार आहे. गट क्र १ – वय वर्षे २१ ते ३० , गट क्र २ – वय वर्षे ३१ ते ४० , गट क्र ३ – वय वर्षे ४१ ते ५०, गट क्र ४ वय वर्षे ५१ ते ६० व गट क्र ६ वय वर्षे ६१ ते पुढे खुला. स्पर्धा शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी सकाळी ६ वाजता सोनजाई डोंगर, वाई येथे संपन्न होणार असून, स्पर्धा संपल्या नंतर त्याच ठिकाणी स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. प्रत्येक गटातील विजेत्या व उपविजेत्या महिलेस आकर्षक बक्षीस व सहभागी प्रत्येक महिलेस सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसून, वाई मध्ये महिलांसाठी प्रथमच आयोजित करीत असलेल्या या गिर्यारोहण स्पर्धेस अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हा असे आवाहन उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, संचालिका डॉ मंगला अहिवळे, श्रीमती नीला कुलकर्णी व श्रीमती अलका घाडगे यांनी केले आहे.
