Home » राज्य » प्रशासकीय » उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

वाई प्रतिनिधी -उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेची सुरवात संस्थेचे सभासद ज्यांचे अहवाल सालात आकस्मित निधन झाले अश्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण करून व संस्थेचे संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.

अध्यक्षीय मनोगतात श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची घौडदौड व वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सांगितला. या वर्षात मिळालेल्या यशाचे श्रेय सर्व सभासद, कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला दिले. माहे मार्च २०२५ अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय २१७ कोटी असून आज अखेर त्यात तब्बल २० कोटींची वाढ झाली असल्याचे सांगितले. संस्थेच्या आता एकूण १० शाखा झाल्या असून उत्कर्ष लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे ९९.८९% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत, ही बाब उल्लेखनीय असून सर्व सभासदांच्या १०० % ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व कर्मचारी व संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली. 

सभासदांनी दिलेल्या अभिप्रायांनुसार काही सुधारणा करण्याचे ठरले. सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर झाला त्याच क्षणी सभासदाच्या खात्यावर तो वर्ग देखील झाला, यासाठी सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला. संस्थेचे सभासद श्री अविनाश जोशी, श्री बाळकृष्ण वाघ , श्री अशोक मांढरे , श्री राजेंद्र इथापे, श्री श्रीपाद कुलकर्णी, श्री रामचंद्र कानडे, श्री अनिल पटवर्धन श्री सतीश कुलकर्णी, श्री. मधू नेने, श्री धर्मराज भोसले व श्री नितीराज बाबर , श्री. सुरेश जाधव, श्री, भगवान भुजबळ इ. यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

तसेच सभेत नियमित कर्ज परत फेडीसाठी विशेष प्रयत्न करणरे कर्जाचे जामीनदार श्री आनंदा सणस व श्री रमेश भिसे यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेचे जेष्ठ सभासद व विचारवंत श्री सतीश कुलकर्णी , डॉ. सुभाष कुलकर्णी, श्री मधुसूदन नेने यांचा सन्मान करण्यात आला. प्रेरणा समीर पवार व माधुरी दिलीप फरांदे यांचा सी. ए. परीक्षेत व प्रियंका जाधव यांना Cost & Management Accountant या परीक्षेत विशेष यश संपादन केले बद्दल त्यांचा विशेष सन्मान करणेत आला. 

सभेच्या विषय पत्रिकांचे वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार , अधिकारी सौ शिवानी पावशे , श्री ओमकार वनारसे व संचालक मंडळ यांनी केले. संचालक श्री भूषण तारू यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड श्री रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे , श्री मदन साळवेकर , डॉ मंगला अहिवळे , श्री श्रीकांत शिंदे , श्री शरद चव्हाण , श्री सालीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे व संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी उपस्थित होते. सभेनंतर सर्व उपस्थित सभासदांना मा. श्री. रमेश फडणीस यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 37 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket