उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन
वाई प्रतिनिधी-राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात बँकींग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून नावलौकिक मिळविलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेची 27 वी वार्षीक सर्वसाधारन सभा शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वा. कै. सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, मधली आळी, वाई येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन अनुराधा कोल्हापूरे यांनी दिली.
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,वाई गेल्या सत्तावीस वर्षापासून यशस्वी वाटचाल सुरू आहे. हे संस्थेच्या उत्कृष्ट कार्यावरून समोर आलेले आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेस राज्य स्तरावरील अनेक पारितोषिके मिळालेली आहे. या संस्थेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाईच्या चेअरमन अनुराधा कोल्हापूरे उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 13 सप्टेंबर 2025 रोजी होणार्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन अनुराधा कोल्हापूरे यांनी केलेले आहे.
