Home » राजकारण » एकी कायम राहणार- आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

एकी कायम राहणार- आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रहार;

शेंद्रे गटातील कार्यकर्त्यांना आवाहन 

सातारा : देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे आधीच नुकसान केले आहे. या बाहेरच्या लोकांनी येऊन सातारकराना स्वाभिमान शिकविण्याची गरज नाही असा प्रहार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. 

शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोनगाव येथील सप्तपदी कार्यालयात झाला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर अरविंद चव्हाण बाजार समितीचे सभापती विक्रम पवार माजी नगराध्यक्ष रंजना रावत विजय पोतेकर संपतराव साळुंखे सुरेंद्र देशपांडे संजय पोतेकर सूर्यकांत पडवळ विश्वास नावडकर प्रशांत पोतेकर सुनील जाधव संजय साळुंखे अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, नामदेव नावडकर, ॲड. अंकुश जाधव मोहनराव साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या संघर्षानंतरही आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. खासदार उदयनराजे आणि माझ्यात कुठलेही राजकीय सेटिंग झालेलं नाही तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा तालुक्यामध्ये जी विकास कामे झाली आहेत. तीच विकास कामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांनीच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देगाव एमआयडीसीला खो घातला होता. साताऱ्याच्या प्रगतीच्या उभे राहिले आहेत आता त्यांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आलेली आहे. सातारा तालुक्यात आपली स्वतंत्र ताकद आहे. आता विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. 

घटना बदलण्याबाबतचा चुकीचा प्रचार विरोधी नेत्यांकडून सुरू आहे वास्तविक मोदी शहा यांनी घटनेला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मते मिळवण्यासाठी आंबेडकर प्रेमी जनतेला फसवण्याचे काम हे विरोधक करत आहेत, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

हीच एकी कायम राहणार..

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा शहरासह तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली एकी पुढे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच गाव पातळीवरील निवडणुकांत देखील कायम ठेवायची आहे, असे सुतोवाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket