जीएसटी-२.० अंतर्गत व्यापाऱ्यांनी ग्राहकांना दर कापातीचा लाभ द्यावा
सातारा: शासनाने जीएसटी-२.० सुधारणांतर्गत अनेक जीवनावश्यक वस्तू आणि घरगुती उपकरणांवरील कर रचनेत मोठे बदल केले आहेत. (उदा. १८% वरून ५% किंवा २८% वरून १८%) किंमतीमध्ये कपात व्हावी व ग्राहकांना फायदा व्हावा असा या GST-२.० कर सुधारणेचा उद्देश आहे.मात्र वारंवार या कार्यालयाकडे अशा तक्रारी प्राप्त होत आहेत की, संबंधीत वस्तूंच्या जीएसटी दरामध्ये कपात होऊन देखील वस्तूची किमत ही जुन्या दराप्रमाणेच आकारली जाते आणि जीएसटी दर कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कर दरात कपात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी संबंधीत वस्तूंच्या किमती कमी करून त्याचा थेट लाभ ग्राहकांना देणे आवश्यक आहे, असे राज्यकर सहायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
GST-२.० मधील बदल शासनाच्या https://gstcouncil.gov.in/sits/default/files/2025-09/press_release_press_information_bureau_0.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रशासनाचे आवाहनः सातारा जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी प्रामाणिकपणे कर कपातीचा फायदा जनतेला द्यावा आणि आपला व्यवसाय पारदर्शक ठेवावा.




