कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन पारंपारीक वेशभूषेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे : सुनील काटकर

उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन पारंपारीक वेशभूषेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे : सुनील काटकर

उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन पारंपारीक वेशभूषेत शिवप्रेमींनी उपस्थित रहावे : सुनील काटकर

सातारा|सातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी कनिष्क मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले. या बैठकीत सर्व उपस्थितांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली.

त्यानुसार सीमोल्लंघनाची जय्यत तयारी करण्यात आली असून हे सीमोल्लंघन खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याने सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी पारंपारीक वेशभूषेत उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक व शिवप्रेमी सुनील काटकर यांनी केले.

या बैठकीत मावळ्यांनी सोहळा अधिक आकर्षक व्हावा यासाठी विविध सूचना मांडल्या. शासन व संयोजन समितीने त्या सूचनांचे एकत्रिकरण करून कार्यक्रमाचे रूपरेषा निश्चित केली आहे. दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा पोवईनाका, सातारा व जलमंदिर येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या सीमोल्लंघन सोहळ्यास सर्वांनी पारंपारीक पोशाखात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील काटकर यांनी केले.

”दसरा मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पारंपरिक पोशाख व फेटे घालून उपस्थित राहिल्यास शाही सोहळ्याला अधिक देखणेपणा येईल. सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावावी.”

रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर म्हणाले,”आमचे दैवत खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून, जल्लोषात हा ऐतिहासिक सोहळा साजरा करूया.”या सीमोल्लंघन सोहळा बैठकीस शिवछत्रपती उदयनराजे मित्र समूहाचे कार्यकर्ते शिवप्रेमी, तसेच सातारकर बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket