Post Views: 108
ट्रम्प टॅरिफचा भारतीय बाजारावर जबरदस्त परिणाम ; सेन्सेक्स-निफ्टी घसरले
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय आयातींवरील 50% टॅरिफ बुधवारपासून लागू झाले असून याचे पडसाद आता गुरुवारी भारतीय शेअर बाजार उघडल्यावर पाहायला मिळत आहेत. बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद होता तर, गुरुवारी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी आपटला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी50 निर्देशांकही 100 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला.
ट्रम्प यांनी 27 ऑगस्ट रोजी भारतावर 25% अतिरिक्त कर लादला पण, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजार बंद होता. मात्र, गुरुवारी बाजार उघडला तेव्हा या करचा थेट परिणाम सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून आला.
