स्मृतिशेष विठ्ठलदादा यादव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त दुधगाव येथे आदरांजली कार्यक्रम
शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजन
दुधगाव, ता. महाबळेश्वर – विश्वशांती बुद्धविहार, दुधगाव येथे स्मृतिशेष विठ्ठल हरिभाऊ यादव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी, दिनांक २१ नोव्हेंबर 2025 रोजी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी, सर्व १०५ मधील लोकसंपर्क आणि शांततामय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे विठ्ठल यादव यांच्या तिसऱ्या स्मृतींचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांसह तालुक्यातील विठ्ठलदादा वर प्रेम करणारे मान्यवर आणि सहकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा शाखा क्र. १ चे अध्यक्ष मंगेश मोरे भूषवणार आहेत. कार्यक्रमाच्या सर्वांगीण नियोजनाची जबाबदारी अभिजित भालेराव यांच्याकडे असून, कार्यक्रमाचे धार्मिक विधी देखील तेच पार पाडणार आहेत.
सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात पंचशील वाचन, त्रिरत्न वंदना, बुद्ध वंदना यांसह स्मृतिशेष विठ्ठल यादव यांच्या तालुक्यातील कार्याविषयी मान्यवरांचे स्मरणपर मनोगते होणार आहेत.
या प्रसंगी पंचक्रोशीतील नागरीक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक संघटनांचे पदाधिकारी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कारण विठ्ठल यादव हे महाबळेश्वर, वाई आणि जावली तालुक्याच्या सर्वात मोठ्या मधुसागर मधोत्पादक सहकारी संस्थेच्या बिनविरोध निवडून आलेले संचालक होते. महाबळेश्वर राष्ट्रवादि पक्षाचे बी.सी, ओबीसी सेलचे आजी तालुकाअध्यक्ष, श्रीरामवरदायिनी जंगल कामगार मजुर संस्थेचे संचालक आणि तळदेव Z.P गटातील गावागावांत व्यक्तिशः मजबुत पकड असणारे गावकी भावकीत माहिर व्यक्तिमत्व होते
स्व. बाळासाहेब भिलारे दादांचे आजीवन निष्ठावंत,
दुधगाव गावचे १० वर्षे सलग सरपंच असा लोकप्रिय जनसंपर्क होता.परंतु शेतात काम करत असतांना त्यांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
दादांचा स्मृतिदिनाचा हा कार्यक्रम शांतता, समता आणि विठ्ठल दादांच्या विकासात्मक विचारांच्या प्रसाराची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांचे पुतणे (अॅड.) डॉ. कुलदिप शिवराम यादव यांनी व्यक्त केला आहे.




