टॉपर्स टॉक’ – टॉप रँकर्सकडून मिळवा यशाची गुरुकिल्ली दिशा ॲकॅडमीचा प्रेरणादायी उपक्रम १४ एप्रिलला शाहू कलामंदिर सातारा येथे
डॉक्टर, इंजिनिअर किंवा शास्त्रज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशा ॲकॅडमीने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. देशपातळीवर यश मिळवलेल्या टॉप रँकर्स विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा आणि त्यांच्या अभ्यासप्रवासातील महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांना उलगडून दाखवणारा ‘टॉपर्स टॉक’ हा विशेष कार्यक्रम १४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात IIT, AIIMS, IISER अशा नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवलेल्या आणि देशात टॉप रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. त्यांनी यशासाठी घेतलेले प्रयत्न, अभ्यासपद्धती, मनोबल वाढविणारी प्रेरणा आणि वेळेचे व्यवस्थापन याबद्दल थेट मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्यक्ष अनुभवातून यशापर्यंतच्या या प्रवासाला समजून घेण्याची संधी, भविष्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दिशा ॲकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे.
विविध प्रेरणादायी सत्र आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे प्रणेते प्रा. डॉ. नितीन कदम (संस्थापक आणि अध्यक्ष – दिशा अकॅडमी) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ घडवण्यासाठी दिशा देण्यासाठी शिक्षणतज्ञ नितीन कदम, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असतील.
विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ८९५६४०७८७१ / ७२ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे देखील आवाहन दिशा ॲकॅडमीने केले आहे.
