कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » आजचे राशींभविष्य दिनांक 3 एप्रिल 2025

आजचे राशींभविष्य दिनांक 3 एप्रिल 2025

     आजचे राशींभविष्य दिनांक 3 एप्रिल 2025

   आजचा दिवस शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल षष्ठी, गुरुवार, दि. ३ एप्रिल २०२५, चंद्र – वृषभ राशीत सायं. ६ वा. २२ मि. पर्यंत नंतर मिथुन राशीत, नक्षत्र – रोहिणी स. ७ वा. ०२ मि. पर्यंत नंतर मृग, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५२ मि.                                                                                  नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत सायं. ६ वा. २२ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मिथुन राशीत राहणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज चंद्र – बुध केंद्रयोग व चंद्र – शुक्र केंद्रयोग व चंद्र – शनि केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.  

 

   दैनंदिन राशिभविष्य

मेष : आर्थिक कामे आज आपण सायंकाळपर्यंत पूर्ण करु शकणार आहात. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. आनंदी व आशावादी रहाल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपल्याला आज विशेष उत्साहाने कार्यरत रहाता येणार आहे. तुमच्या विचारांचा व तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. 

मिथुन : मानसिक अस्वस्थता असणार आहे, त्यामुळे दैनंदिन कामात तुमचे लक्ष लागणार नाही. आज काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. आज आपण आपले मानसिक स्वास्थ्य जपावे.  

कर्क : आर्थिक लाभ होतील. काहींचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. प्रियजन भेटतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. उत्साहाने व आनंदाने आज आपण कार्यरत रहाणार आहात. 

सिंह : आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. आज आपल्याला अनेक कामात सुयश मिळेल. आपली दैनंदिन कामे आपण विनासायास पूर्ण करु शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

कन्या : आनंदी रहाल. आज आपण विशेष मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आपले तेच खरे कराल. काहींना आपल्या कार्यक्षेत्रात विशेष सुसंधी लाभेल. मनोबल वाढणार आहे. 

तुला : आज आपण कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीपासून दूर रहावे. वाहने जपून चालवावीत. आज काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. मन शांत ठेवावे.

वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. प्रवास सुखकर होतील. आजची आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होतील. 

 

धनु : आज काहींचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.  

मकर : आनंदी रहाल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. सार्वजनिक व सामाजिक कामात तुम्ही स्वतःला गुंतवणार आहात. काहींना मानसन्मान लाभेल. 

कुंभ : मनोबल उत्तम असल्याने आजची आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होतील. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुम्ही आनंदी व आशावादी असणार आहात. 

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक ताकद वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. काहींना कामानिमित्त अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. 

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket