शिवम कॉलनीतील विद्युत पोल कोसळण्याचा धोका. नगरपालिका प्रशासनाला दिले निवेदन. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
सातारा: शिवम कॉलनी गडकर आळी येथील चौकातील मुख्य विद्युत पोल तळातून पूर्णपणे गंजला असून तो निकामी झाला आहे. त्यामुळे हा विद्युत पोल नागरी वस्तीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरी वस्तीमध्ये असलेल्या विद्युत पोलवरून कॉलनीमधील इतर विद्युत पोलवर विद्युत तारा गेल्याने हा विद्युत पोल कोसळला तर कॉलनीमध्ये मनुष्य हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी शिवम कॉलनीतील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन राजकुमार गणेश नरूले यांनी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त आहेत या ठिकाणी हा विद्युत पोल बदलून नवीन विद्युत पोल उभारण्यात यावा अशी मागणी शिवम कॉलनीतील नागरिकांकडून होत आहे.
धोकादायक ठरू पाहत असलेला विद्युत पोल त्वरित बदलण्यात यावा. अवकाळी पाऊस व वादळ यामुळे हा पोल पूर्णपणे हलत असून विद्युत पोलचा खालचा भाग अर्धवट तुटलेला आहे त्यामुळे तो केव्हाही कोसळू शकतो म्हणून मनुष्य हानी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
श्रीरंग काटेकर, शिवम कॉलनी सातारा
