Post Views: 178
काँटा लगा गर्ल’ने हार्ट अटॅकमुळे गमावला जीव
मुंबई -लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनानंतर अवघ्या मनोरंजन विश्वातून शोककळा व्यक्त केली जातेय.बिग बॉस 13′ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. 27 जून रोजी रात्री या अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीचे निधन कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याची माहिती रुग्णालयाकडून समोर आली.
