Home » जग » थायलंड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये मोठा भूकंप

थायलंड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये मोठा भूकंप

थायलंड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये मोठा भूकंप

म्यानमारमध्ये शुक्रवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जमीन हादरली. हे भूकंप इतके शक्तिशाली होते की ते थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी होती. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सागाईंग येथे होते. म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय अवा पूल भूकंपाच्या धक्क्यामुळे कोसळल्याचे वृत्त आहे. चीन आणि तैवानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपामुळे बँकॉक पूर्णपणे बंद आहे. मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शेअर बाजारातही व्यवहार थांबले आहेत. विमानतळ आणि भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ४३ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसतायत. लोक त्यापासून दूर पळतायत.एका इमारतीतल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हीडिओत दिसलं.या संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालिन बैठकही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल त्यांना चिंता आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. आम्ही प्रशासनाला या संदर्भात सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वादळात आमदारकी उडाली आता स्फोटात कारखाना जाणार- पार्ले येथे आमदार मनोज घोरपडे यांची चपराक

Post Views: 161 वादळात आमदारकी उडाली आता स्फोटात कारखाना जाणार– पार्ले येथे आमदार मनोज घोरपडे यांची चपराक कराड प्रतिनिधी  -सह्याद्री

Live Cricket