पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
हेळवाक रासाठी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला
पाटण :कोयना धरण आधी धरण नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे अशी मी भूमिका घेतली त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला. यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची महत्त्वाची भूमिका होती.
याप्रसंगी पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री जयवंतराव शेलार, श्री गोविंद कुराडे, श्री बबन पाटील, श्री निजामभाई, श्री भैयासाहेब पाटणकर, श्री शंतनु भुमकर, श्री अशोकराव पाटील, श्री प्रदीप पाटील, श्री नंदकुमार सुर्वे, श्री भैयाजी शेळके, श्री हेमंत कापले यांची उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे कोयना धरण नसते तर महाराष्ट्र अंधारात असता. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे मोठे उपकार महाराष्ट्रातील जनतेवर आहेत. कोयना धरण बांधली जात असताना जनतेने कोणतेही आडेवाडे घेतले नाहीत घरादाराची परवा न करता धरणाकरता जमिनी दिल्या. त्यावेळच्या राज्यकर्त्यांवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र इतर धरणांची कामे सुरू असताना धरण आणि पुनर्वसन या बाबी एकाच वेळी केल्या जाव्यात असा मी आग्रह धरला त्यातूनच पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला असे उदयनराजे म्हणाले.
श्री शंभूराजे देसाई म्हणाले, राज्य शासनाने कोयना जलपर्यटनासाठी साडेतीनशे कोटींचा आराखडा तयार केला. मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले कोयना भागातील पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये पर्यटकांना जवळून कोयना परिसरातील निसर्ग पाहता येईल आचारसंहिता संपताच या भागातील पर्यटन आराखड्याच्या अनुषंगाने पाहणी दौरा केला जाणार आहे. या भागातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महायुतीच्या सरकारने प्रयत्न केले आहेत त्यामुळे खासदार उदयनराजेंच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन श्री शंभूराजे यांनी केले.
कमळ धनुष्यबाणाचे साटेलोटे :आपल्या सर्वांना केवळ धनुष्यबाणाचे चिन्ह लक्षात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेचे साठे लोटे केलेले आहे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मदत करायची आहे. दोन्ही पक्षांचे साटे लोटे झाले असल्याचे श्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.