“रील्स-फ्लेक्सची चमकोगिरी करणाऱ्या रणजित भोसले यांचा वैयक्तिक आकस माझ्यावरची निलंबन कारवाई ही सूडबुद्धीची” – विकास शिंदे यांची पत्रकार परिषदेत घणाघाती टीका
सातारा –शिंदे गटाचे (शिवसेना )सातारा जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी वैयक्तिक आकस आणि अंतर्गत कुरघोड्या यामुळे माझ्यावर निलंबनाची कारवाई केली, असा थेट आरोप युवा नेतृत्व विकास ‘आण्णा’ शिंदे यांनी आज साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
वाई–खंडाळा–महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करत 110 शाखा उभारल्या आणि 25 हजारांहून अधिक सभासदांची नोंदणी केली, तरीही माझ्या कामाचा वेग आणि वाढता प्रभाव काहींना सहन न झाल्याचा शिंदेंचा टोला.
“युवा सेनेतून आलेले जिल्हाध्यक्ष रणजित भोसले मनमानी करत आहेत”
विकास शिंदे म्हणाले—
भोसले यांना माझा कार्यकर्त्यांमधील वाढता ओघ खटकला. पक्षाची वाढ पाहायची सोडून फक्त चमकोगिरी, रील्स-फ्लेक्स आणि वैयक्तिक अजेंडा यात ते गुंतले आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नगरपालिकेतील निधी तुटवड्यावरही गंभीर आरोप
वाई तालुक्यातील नगरपालिकेच्या कामकाजातही भोसले यांनी अंतर्गत कुरकुरी करून निधीमध्ये तुटवडा निर्माण केल्याचा गंभीर आरोप शिंदेंनी केला.
“मंत्री शंभूराज देसाई साहेबांसह वरिष्ठांकडे तक्रार करणार”
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. माझ्यावर झालेला अन्याय मी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि वरिष्ठांकडे मांडणार,” असे शिंदेंनी जाहीर केले.
“वाईतील शिंदे कुटुंबीयांचे योगदान मोठे, तरी वैयक्तिक स्वार्थाचा वार”
“वाई तालुक्यातील राजकारणात शिंदे कुटुंबीयांचे योगदान मोठे असताना माझ्यावर केलेली कारवाई म्हणजे वैयक्तिक स्वार्थाचा परमोच्च बिंदू आहे,” अशी टीका करत शिंदेंनी जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांना थेट लक्ष्य केले.




