दुआ,दवा आणि डॉक्टरांनी केला आयुष्याचा दोर बळकट
इस्लामपूर – प्रतिनिधी मुलांच्या विवाहापित्यर्थ स्नेह भोजन…. समोर नातेवाईकांसह आयुष्यात जोडलेला मित्र परिवार…. रात्री १० च्या सुमारास…दहा दिवस मुलांच्या विवाहाची धावपळ, ताणामुळे अचानक शारीरिक असाह्य वेदना… तत्काळ रुग्णालयात दाखल केले… त्रास वाढत होता… डॉक्टरांना केस हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आले… कुटूंबाला याची माहिती देताना चिंता व्यक्त केली…
पुढील उपचारासाठी कराडला संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलवा, असा दिलेला सल्ला…हि वार्ता समजेल तो हॉस्पिटल कडे धाव घेत होता… प्रचंड गर्दी… कुटुंबासह जमलेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भिती… आजपर्यंत सामाजिक बांधिलकीतून केलेली कामे, गरजूंना केलेली मदत, निराधारांना दिलेला आधार… यातून जोडलेली हजारो मंडळींची दुवा….तरीही उपचाराला शरीर साथ देत नव्हते.. रुग्णवाहिका कराडच्या संजिवनी हॉस्पिटलला पोहचली…. सुप्रसिद्ध वैद्यकिय तज्ञ अशी अल्पवधीत ख्याती मिळवलेले गोल्ड मेडलिस्ट डॉ. विजयसिंह पाटील… त्यांनी तपासले, गंभीरता ओळखून सलग पाच तास शर्थीचे प्रयत्न….. अखेर त्याला यश आले…. संकट टळले… तेव्हा अनेक जण बोलले…. दातृत्वाचा अवलिया अशी सर्वदूर ओळख असलेले यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव यादव यांच्या आयुष्याचा दोर हा दवा, दुवा आणि डॉ. विजयसिंह पाटील यांच्या प्रयत्नांनी पुन्हा चांगलाच बळकट केला.
सांगली जिल्ह्यातील केमिकल इंडस्ट्रीज क्षेत्रात विश्वसनीय ब्रँड म्हणून इस्लामपुरच्या सोना केमिकल इंडस्ट्रीज नावाची विशेष ओळख निर्माण करण्यात उद्योजक सर्जेराव यादव हे यशस्वी झाले आहेत. गेल्या आठवड्यात मुलाचा लातूर येथे मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा संपन्न झाला. त्याच्या दोन दिवसांनी मल्टीपर्पज हॉलवर स्वागत समारंभ सुरू असतानाच सर्जेराव यादव यांना अचानक शारीरिक वेदना सुरू झाल्या… त्याची तीव्रता वाढू लागल्याने त्यांना इस्लामपूर येथील… खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले… वाढता त्रास उपचाराला दाद देत नसल्याने संभाव्य धोका ओळखून संबंधित डॉक्टरांनी तत्काळ पुढील उपचारासाठी कराडच्या संजिवनी हॉस्पिटलमधील डॉ.विजयसिंह पाटील यांच्याकडे जाण्यास सांगितले. ही वार्ता शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने अनेकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली….
आजपर्यंत व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीतून केलेल्या अफाट कार्यामुळे सर्जेराव यादव यांची सर्वदूर ओळख पसरली आहे.याचा प्रत्यय हॉस्पिटल समोर जमलेल्या गर्दीने लक्षात आला.
कराडच्या संजिवनी हॉस्पिटलमध्ये डॉ.विजयसिंह पाटील यांनी स्वतः तत्काळ योग्य तपासण्या करून दिलेल्या औषधाने ही असाह्य त्रास तब्बल पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी नियंत्रणात आला. याच उपचारानी जणू पुनर्जन्म झाल्याची महती अनुभवणाऱ्या सर्जेराव यादव यांच्या कुटुंबीयांनी संजिवनी हॉस्पिटल आणि डॉ. विजयसिंह पाटील यांची कृतज्ञता व्यक्त करणारा विशेष कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मात्र अनेक जण बोलत होते,यादव साहेबांच्या आयुष्याचा दोर त्यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीतून कार्य, गरजूंना मदत, निराधारांना आधार यांची दुवा, औषधे आणि डॉ.विजयसिंह पाटील यांनी केलेले योग्य उपचारांनी तो बळकट केला.